Categories: करमाळा

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदतीसाठी शासन कटीबद्ध : सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील अतिगृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदतीसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर करणार असून शासन मदतीसाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना संजय शिरसाट यांनी दिली . करमाळा बाजार समितीमधे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणेसाठी आयोजीत मेळाव्यामधे ते बोलत होत होते .यावेळी खा धैर्यशील मोहिते – पाटील, आ नारायण आबा पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप उपस्थित होते . ना शिरसाट यांनी करमाळा तालुक्यातील सरपडोह, बिटरगाव या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली व शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या . उपस्थित अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले .त्यानंतर करमाळा येथे बाजार समितीने केलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले . या प्रसंगी आयोजीत शेतकरी मेळाव्यात खा धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे, शंभूराजे जगताप, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळणेसह मतदारसंघातील प्रलंबीत विकासकामांना मान्यता व निधीची मागणी केली . यावर सामाजिक न्यायमंत्री शिरसाट यांनी खा . मोहिते पाटील, आ .पाटील व माजी आ .जगताप यांना उद्देशून सामाजिक न्याय खात्याशी निगडीत प्रस्ताव तातडीने दाखल करा अवघ्या आठच दिवसांत ५० ते ६० कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता देतो अशी घोषणा केली . तसेच करमाळा बाजार समितीने स्वनिधीतून केलेले रस्ते क्राँक्रिटीकरण व अन्य सोयी सुविधांची माहिती घेवून समितीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले .यावेळी महिला नेत्या सवितादेवी राजेभोसले, युवासेनेचे सागर पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव जगताप, अमोद संचेती, आदिनाथचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील, प्रशांत ढाळे, आल्ताफ तांबोळी, श्रेणीक खाटेर, धुळाभाऊ कोकरे , जालिंदर पानसरे, महादेव कामटे, नागनाथ लकडे, तात्यासाहेब शिंदे, औदुंबर मोरे, जनार्धन नलवडे, सागर दोंड, बबनराव मेहेर , महादेव डुबल, वैजीनाथ कदम, दादासाहेब लबडे , अहमद कुरेशी, बाळासाहेब बलदोटा, मुख्याधिकारी सचिन तपासे, विशेष लेखापरीक्षक सुनील काळे यांचेसह बाजार समिती व आदिनाथ कारखान्याचे आजी – माजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, गट सचिव ,शेतकरी व्यापारी व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन प्रा . दत्तात्रय भागडे यांनी केले . आभार युसूफ शेख यांनी मानले . कार्यक्रमासाठी बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षिरसागर व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले .

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

19 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

22 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

23 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago