Categories: करमाळा

करमाळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या आसमानी संकटावर तहसीलदार सौ.शिल्पाताई ठोकडे यांनी उत्तम प्रशासक म्हणून केली यशस्वी मात

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यावर अतिवृष्टीमुळे अस्मानी संकट कोसळलेल्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान अनेकांचे संसार उघड्यावर आले अशा परिस्थितीमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून खंबीरपणे भुमिका पार पाडण्यासाठी तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी उत्तम प्रशासक म्हणून काम केल्यामुळे त्यांच्या कामाची सर्वत्र कौतुक होत आहे. करमाळा तालुक्यातील संगोबा कोर्टी व तालुक्यातील बरीच गावी ‌ अतिवृष्टीमुळे बाधित झाली होती यामध्ये प्रामुख्याने ‌ संगोबा ‌ येथे सीना नदीच्या वाहत्या प्रवाहामुळे येथील आदिनाथ मंदिरामध्ये ‌ 90 जण अडकून पडले होते आजूबाजूची शेती पूर्ण पाण्यात गेली होती अशा परिस्थितीमध्ये माणसांचे जीव वाचले पाहिजे ‌ या खंबीर भूमिकेतून तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी प्रशासक म्हणून ‌आमदार नारायण आबा पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील,जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद ‌पालकमंत्री जयकुमार गोरे ‌ मा. आमदार व सर्व लोकप्रतिनिधी नेत्यांचा समन्वय साधून त्यांच्या सहकाऱ्यांने करमाळा तालुक्यात ‌ आलेल्या अतिवृष्टीमुळे आसमानी संकटावर यशस्वीपणे ‌ मात केली आहे. संकटात सापडल्यावरच खऱ्या अर्थाने माणसाची कसोटी लागत असून आपल्या कार्यकर्तुत्वा ची धमक ची खरी या काळातच बघायला मिळते. करमाळा तालुक्यात आलेल्या संकटावर न घाबरता भावना विवोश न होता तहसीलदार शिल्पा ताई ठोकडे‌ यांनी खऱ्या अर्थाने स्त्रीशक्ती हीच खरी राष्ट्रशक्ती असून सर्व जगाची जननी आहे . हे आपल्या कार्याद्वारे खऱ्या अर्थाने दाखवून दिले आहे ‌. आपली ‌‌ प्रशासकीय ‌ टीम ‌ तयार करून आपत्ती व्यवस्थापन यांचे सहकार्य घेऊन स्वतः कुटुंबप्रमुख ‌ म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. करमाळा तालुक्यात त्यांनी यशस्वीपणे आपले काम केल्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.स्वतःच्या जीवाची परवा न करता सर्वसामान्य जनतेची काळजी घेऊन त्यांना संकटातून सही सलामत बाहेर काढून त्यांची झालेले नुकसान भरून देऊन शासनामार्फत त्यांना सर्वतोपरी मदत मिळून देण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मंत्री रोहित कदम, मंत्री संजय शिरसाठ तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांना नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राबरोबरच सर्वांना सरसकट ‌ नुकसान भरपाई मिळावी याकरता योग्य असा प्रस्ताव देऊन मदत मिळवुन देण्यासाठी योग्य तो पाठपुरावा केल्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे. पूरग्रस्तांना मुदतीसाठी स्वतंत्र असा पुरग्रस्त मदत कक्ष स्थापन केला असून शेतकऱ्यांनी मदत मिळवून देण्यासाठी मार्ग सुकर झाला आहे. शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन ‌ अतिवृष्टीमुळे ‌ बाधित झालेल्या शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांचा संसार परत फुलवण्यासाठी खऱ्या अर्थाने स्वतः पुढाकार घेऊन तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी उत्तम कर्तबगार अधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.महसूल असेल किंवा प्रशासनातील कुणीही कर्मचारी असेल,आपत्तीच्या काळात ते हात राखून काम करीत नाहीत. पण त्यांनाही प्रपंच असतो, मुलं बाळ असतात.. त्यांच्याही जीवित्ताचा प्रश्न असतो..आपत्तीत अडकलेल्या लोकांचा बचाव करण्याचे त्यांनी  शिक्षण घेतलेले नसते.तरीही ते झटून काम करतात. संगोबाच्या प्रकरणात त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे ते नाकारून चालणार नाही. तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांचे या काळातील काम उल्लेखनीय होते. त्यांनी शब्दशः रात्रीचा दिवस केला त्यामुळे त्या कौतुकाला पात्र आहेत बऱ्याच नागरिकांनी, राजकीय नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्ते पोलीस प्रशासनाने येथे जे बचाव कार्य केले ते नक्कीच कौतुकाला पात्र आहे कर्तबगार अधिकाऱ्यांच्या कार्यास मनापासून सलाम त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

12 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

16 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

17 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago