Categories: करमाळा

माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केली सीना नदी काठची पाहणी विस्थापित पुरग्रस्थांनां केले ब्लॅंकेट वाटप

करमाळा प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील पुराचे पाणी व करमाळा तालुक्यात सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे सीना नदीकाठच्या गावांना पुराचा तडाखा बसला.8 दिवसात 3 वेळेस संगोबा पुलावर पाणी आल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळित झाले.सीना नदीकाठ परिसरात पावसाने उडवलेल्या या हाहाकाराची पाहणी करमाळा तालुक्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आज कार्यकर्त्यांसमवेत केली. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ आवताडे ,जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार, भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अजिंक्य पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष सुजित तात्या बागल, शिवराज जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका प्रवक्ते ॲड अजित विघ्ने  माजी सरपंच आशिष गायकवाड, राष्ट्रवादी उद्योग व्यापार आघाडी तालुकाध्यक्ष प्रसाद जगताप यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळी मांगी तलावाच्या सांडव्यातील पाणी शेतात उलटल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. खडकी व तरटगाव येथील सीना नदी पात्रातील बंधाऱ्यांचे झालेली तुटफूट व नदीपात्रातून पाणी उलटून शेतकऱ्यांचे झालेले पीक नुकसान यांची पाहणीही त्यांनी केली.खडकी, बिटरगाव श्री ,तरटगाव, संगोबा, बोरगाव,आळजापूर ,फिसरे,आवाटी येथील शेती नुकसानीची व संगोबा बंधार्‍याची पाहणी ही त्यांनी केली.सीना नदी काठावरील महत्त्वाचे बंधारे फुटलेले आहेत त्यामुळे पोटेगाव येथील बंधारा पूर परिस्थिती ओसरल्यानंतर तात्काळ पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे त्यांनी यावेळी सांगितले.
ही पाहणी करत असतानाच आनंदी मंगल कार्यालय पोथरे ,महामुनी मंगल कार्यालय करमाळा, आवाटी येथील दर्गा व विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांची त्यांनी भेट घेऊन त्यांना तात्काळ काय मदतीची आवश्यकता आहे याबाबत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे विचारणा केली. संबंधित विस्थापित नागरिकांना पांघरण्यासाठी ब्लॅंकेट ची आवश्यकता असल्याची मागणी तहसीलदार यांनी केल्यानंतर त्यानुसार विस्थापित नागरिकांना जेवढे ब्लँकेट लागतील तेवढे ब्लँकेट देण्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी जाहीर केले.
काल रात्री तहसील कार्यालयाच्या मागणीनुसार संजयमामा यांच्या सूचनेनुसार महामुनी मंगल कार्यालय येथील विस्थापितांना 85 ब्लॅंकेट चे वाटप संजयमामा शिंदे गटाचे शिवराज जगताप, अजिंक्य पाटील व सुजित तात्या बागल यांच्या हस्ते करण्यात आले. आज आनंदी मंगल कार्यालय व आवाटी दर्गा येथील विस्थापितांसाठी आवश्यक असलेल्या ब्लँकेट मा .आ. शिंदे यांचे कडून तहसील कार्यालयात जमा केल्या .तहसील कार्यालयाकडून बाधितांना त्याचे वाटप केले जाईल.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

3 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

6 days ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

6 days ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

7 days ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago