Categories: करमाळा

लेडी सिंगम तहसिलदार सौ. शिल्पा ठोकडे एक सक्षम अधिकारी, पुरग्रस्तांसाठी ठरल्या साक्षात नवदुर्गा-ॲड अजित विघ्ने

करमाळा प्रतिनिधी–सिना नदीच्या काठावर पुरामुळे जनजीवन विस्कळित झाले.अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीने काही लोक पुराच्या पाण्यात आडकुन पडल्याची बातमी ऐकायला मिळाली. साहजिकच याचा ताण प्रशासनावर अधिकच पडतो. एक तर नवरात्राची सुरुवात सर्वत्र दुर्गामातेचा उत्सव.. अशा परिस्थितीत बाहेर धो-धो पडणारा पाऊस.. पाहील तिकडे रस्त्यावर पाणीच पाणी.. सिना नदीला आलेला पूर आणि पुरामुळे जिवितहानी होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणेवर आलेला ताण .. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या किती महत्वाच्या आणि आव्हानात्मक असतात त्याची अनेक उदाहरणे आपण पहातो. कालचा सिना नदीकाठावर आलेला महापुर जनसामान्यां साठी अतिशय कठीण प्रसंग होता.. परंतु या प्रसंगात संयम ठेवुन आपल्या तालुक्यातील पुराचे पाण्यात आडकलेली माणसे सुरक्षित स्थळी आणण्याचे काम अतिशय सक्षमपणे तहसिलदार सौ. शिल्पाताई ठोकडे मॅडम यांनी केलेले आहे. तालुक्यातील आपल्या अधिकाऱ्यांची टिम तयार करून रात्रीचे वेळी सर्व नियोजन करून कोणतीही जिवित हानी झाली नाही पाहीजे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवुन अतिशय जिगरबाज पद्धतीने त्यांनी काम केले आहे. नैसर्गिक आपत्तीने बऱ्याच गावांमधील शेत शिवारांचे, पिकांचे, पशुधनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. गावांमधे पाणी शिरल्यामुळे घरे-दारे, शाळा, ग्रामपंचायतीच्या इमारती, एमएसईबी सबस्टेशन अक्षरशः पाण्यात होती. एकदा दोनदा नाही तर तब्बल चार वेळा सिनामाई दुथडी भरून वाहीली.. अक्षरशः काही ठिकाणचे रस्ते, पुल देखिल खचुन गेले आहेत. आजपर्यंतच्या इतिहासात सिना नदीच्या काठावर एवढया मोठ्या प्रमाणात पुर येथील लोकांनी पहिल्यांदाच पाहीला असे बुजुर्ग मंडळी सांगतात. त्यामुळेच पडणाऱ्या पावसाचा आणि पुराचा अंदाज न आल्यामुळे सिनेकाठचे नागरिक गाफील राहीले. खरं तर अशा कठीण प्रसंगातही लोक गावातुन, घरातुन लवकर बाहेर सुरक्षित स्थळी जायला तयार नव्हते. प्रसंग फारच बाका होता.. अशा प्रसंगी संयमाने परिस्थिती हाताळत आपली सर्व यंत्रणा व्यवस्थितपणे कामाला लावण्याचे कार्य तहसिलदार सौ. शिल्पा ठोकडे यांनी केले. भर पावसात रात्रीचे वेळी संगोबा व सर्व सिना काठावरील परिस्थितीचा अंदाज घेत प्रथमतः सर्व लोक सुरक्षित बाहेर काढली. नवरात्रीचे काळात या महिला अधिकारी फक्त अधिकारी म्हणुन न मिरविता मी तुमच्यातलीच एक आहे असा दिलासा सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी दिला आहे. अगदी पहिल्याच दिवसापासून दिवस रात्र एक करून प्रत्येक कुटुंबाची रहाण्याची, जेवणाची सोय कशी करता येईल ते अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने त्यांनी केले. या दरम्यान वरिष्ठ अधिकारी यांचे दौरे.. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे सह अनेक नेते मंडळीचे दौरे यशस्वीपणे हाताळले आहेत. आम्ही या आठ नऊ दिवसात बऱ्याच वेळा कार्यालयात किंवा पुरग्रस्त भागात गेल्यावर कळायचे की मॅडम दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ पुरग्रस्त नागरिक यांचे सेवेसाठी तत्परतेने भेटी घेतात. आवश्यक त्या गोष्टी तात्काळ उपलब्ध करून देतात. अशा कठीण प्रसंगात पुरग्रस्तांचा सगळा संसार उघड्यावर आलेला असताना, घरादारा मधे चिखलाचे साम्राज्य पसरले असताना डोळ्यासमोर अंधाऱ्या उभा राहतील असा प्रसंग असताना प्रसंगावधान ठेवुन यावर जिद्दीने मात करण्यासाठी यावेळी सक्षम अधिकाऱ्याची गरज लागणार होती. ती नेमकी या नवदुर्गाच्या रुपात लाभलेल्या तहसिलदार मॅडम यांनी पुर्ण केली आहे. जनसामान्यांना एक खंबीर आधार देण्याचे काम त्यांनी या काळात केले आहे.वास्तविक नोकरदार अधिकारी म्हणले की .. आपल्या चार दिवस पाट्या टाकायचे काम करायचे आणि पगार घ्यायचा असे धोरण असते परंतु तहसिलदार मॅडम यांनी आपले सगळे प्रशासन सोबत ठेवुन समन्वय साधत पुरग्रस्त बांधवांसाठी मोलाची कामगिरी केली आहे. एक जिगरबाज आणि डॅशिंग अधिकारी म्हणुन त्यांची पुर्वी पासुनच ओळख आहे. पुरग्रस्तांचे मदतीकरीता कोल्हापुर, कागल भागातुन काही लोक आले होते. त्यांचे सोबत आमचे बोलणे झाले. त्यावेळी समजले की आपल्या तहसिलदार मॅडम त्या ठिकाणी काही काळ होत्या आणि तिथे पण कायम पुर स्थिती निर्माण होते. त्या ठिकाणचे लोकांना दरवर्षी येणाऱ्या पुरस्थितीची कल्पना असते त्यामुळे याचे त्यांना काहीच वाटत नाही मात्र दरवर्षी प्रशासनाला तिथे सर्व आवश्यक यंत्रणा उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे त्या ठिकाणचे परिस्थितीचा नेमका अंदाज व अनुभव आदरणीय मॅडम यांना असल्यामुळे आपल्याकडे अचानक उद्भवलेल्या या कठीण प्रसंगात त्यांचा अनुभव देखिल उपयोगाला आलेला आहे. एक सक्षम स्त्री महिला अधिकारी म्हणुन नक्कीच त्यांची कामगिरी अभिमानास्पद अशी आहे. अशा जिगरबाज अधिकाऱ्यांची आपणास गरज आहे. या पुरामुळे निश्चितच अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. त्यातुन सावरण्यासाठी शासन, सामाजिक संस्था,अधिकारी, पदाधिकारी, समाजसेवक, नेतेमंडळी सर्वच स्तरातुन मदतीचा ओघ चालु आहे. निश्चितपणे सर्वांचे सहकार्य आणि मदतीमुळे पुरग्रस्तांना या संकटातुन बाहेर येण्यासाठी महत्वाची मदत होईल. सोलापुर जिल्हयाच्या जिल्हाधिकारी साहेब यांचेसहीत सर्वच अधिकारी, पदाधिकारी यांनी केलेले कामही उल्लेखनीयच आहे.परंतु या संकटात सर्वात आधी अतिशय धिरोदत्तपणे आपल्या प्रत्येक नागरिकांना या संकटातुन बाहेर काढणाऱ्या या नवदुर्गेला निश्चित सलाम करावासा वाटतो. आदरणीय तहसिलदार सौ. शिल्पा ठोकडे मॅडम या फक्त अधिकारी नाहीत तर त्यांचे मधे एक समाजसेवक सुद्धा दडला आहे . आणि त्यामुळेच आपल्या तालुक्यावर लोकांवर आलेले हे संकट पार करण्यासाठी, परतावण्यासाठी ही नवदुर्गा आई, कमभवानी, जगदंबेच्या रुपाने आपल्याला तहसिलदार म्हणुन लाभलेल्या आहेत.त्यामुळे जिगरबाज असणाऱ्या करमाळाच्या तहसिलदार सौ. शिल्पा ठोकडे मॅडम यांचे या कार्याला सलाम केलाच पाहिजे

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago