Categories: करमाळा

करमाळा तालुका अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळा या शाखेच्या महिला तालुकाध्यक्षपदी सुषमा  गिरवलकर यांची निवड‌

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळा या शाखेच्या महिला तालुकाध्यक्षपदी सुषमा ज्योतीराम गिरवलकर यांची निवड तालुकाध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी केली आहे. सौ सुषमा ज्योतीराम गिरवलकर यांची महिला तालुकाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल ‌ त्यांचा सत्कार संतोष काका कुलकर्णी यांच्या धर्मपत्नी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या मार्गदर्शिका सौ. शामल संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते व ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य ‌ भारत घुगीकर काका व संस्थेचे कार्याध्यक्ष निलेश गंधे यांच्यावतीने करण्यात आला. यावेळी निवड झाल्यानंतर ‌ सौ सुषमा गिरवलकर यांनी ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था शाखा नाशिक यांच्या माध्यमातून ब्राह्मण समाजातील महिलांचे संघटन करून त्यांना स्वयंरोजगार व आर्थिक दृष्ट्या स्वालंबी जीवन जगण्यासाठी आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी मयुरी गंधे, वैष्णवी कुलकर्णी, मंजिरी जोशी, निकिता कुलकर्णी ,अनिता कुलकर्णी, रेखा जोशी ,सुशीला कुलकर्णी, आशा कुलकर्णी, शारदा गंधे ,दिपाली विद्वत वैशाली विद्वत,सौ मीना घुगीकर प्रियांका जोशी उपस्थित होत्या. त्यांच्या निवडीबद्दल अखिल ब्राह्मण समाजाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

18 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

21 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

22 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago