Categories: करमाळा

करमाळ्यात उद्या भरणार विषमुक्त भाजीपाला बाजार पाणी फाउंडेशन चा पुढाकार


करमाळा प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये उद्या दिं.5 ऑक्टोबर, रविवार रोजी विषमुक्त भाजीपाला बाजार भरणार असून याप्रसंगी पाणी फाउंडेशन चे राज्य समन्वयक सत्यवान देशमुख, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून विषमुक्त भाजीपाला खरेदीसाठी करमाळा तालुका व शहरातील सुज्ञ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पाणी फाउंडेशन टीम करमाळा चे प्रतीक गुरव व आशिष लाड यांच्याकडून करण्यात आले आहे.
विज्ञान तंत्रज्ञानाच्या सध्या धकाधकीच्या युगामध्ये माणसाचं शारीरिक स्वास्थ्य हरवत चाललं आहे .लहान मुलांना सुद्धा वेगवेगळे आजार जडू लागले आहेत. हृदयविकार ,मधुमेह यांचे प्रमाणही वाढू लागलेले आहे. कर्करोगाने तर सर्वत्रच थैमान घातलेले आहे या सगळ्यांचे मुख्य कारण म्हणजे आहार हे आहे .भरमसाठ कीटकनाशकांची फवारणी केले गेलेले अन्न ग्रहण करण्यात आल्यामुळे असे घडत आल्याचे निष्कर्ष आहेत.त्यामुळे हे टाळायचे असेल तर विषमुक्त अन्न आणि विषमुक्त भाजीपाला ग्राहकांना उपलब्ध झाला पाहिजे हीच संकल्पना डोळ्यापुढे ठेवून पाणी फाउंडेशन टीम करमाळा यांनी गेल्या 6 महिन्यापासून विषमुक्त भाजीपाला पिकविणारे उत्पादक व विषमुक्त भाजीपाला खरेदीसाठी इच्छुक असलेले ग्राहक यांचा मेळावा यशकल्याणी संस्था या ठिकाणी घेऊन या विषयी जाणीव जागृती केली होती.
या सुरुवातीनंतर सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा ,समृद्ध गाव स्पर्धा ,फार्मर कप स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून विषमुक्त उत्पादन घेण्याचा कल असलेले तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील शेतकरी एकत्र करून विषमुक्त भाजीपाल्याचे उत्पादन घेतले आहे.महेंद्र देशमुख,अतुल राऊत ,सोमनाथ सायकर ,विजय अवताडे ,गोपीनाथ रोकडे ,सुनील दौंडे ,हिराजी राऊत ,धनाजी माने ,जीवन होगले,विक्रम खरात,प्रताप जाधव या शेतकऱ्यांचे विष मुक्त भाजीपाल्याचे स्टॉल असणार आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago