Categories: करमाळा

शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर झालेल्या हल्ल्याशी आपला कसलाही संबंध नाही-दिग्विजय बागल

करमाळा प्रतिनिधी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर झालेल्या हल्ल्याशी आपला कसलाही संबंध नाही आम्ही एकाच पक्षात असल्याने आपसात कुठल्याही प्रकारचे वैमनस्य नसल्याचे मत मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन शिवसेनेचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे ‌.या पत्रकार परिषदेला मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर, आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे, मा.व्हाईस चेअरमन रमेश आण्णा कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप उपस्थित होते. याबाबत पुढे बोलताना दिग्विजय बागल तयांनी सांगितले की चिवटे यांच्या कुटुंबीयांशी आमचे स्व.दिगंबरराव बागल मामा यांच्यापासून कौटुंबिक संबंध आहेत.करमाळा तालुक्यात मी शिवसेनेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत असुन जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची निवडणुक लढविली आहे. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करत आहे याचा आपल्याला सार्थ अभिमानच आहे. राजकीय विरोधक जरी शिवसेनेत येत असतील तरी ते आपल्या पक्षात येत असल्यामुळे पक्ष संघटन वाढत असल्यामुळे याचा फायदा होणार आहे. याबाबत त्यांचा माझ्याबाबत गैरसमज निर्माण झाला आहे. उलट शिवसेना पक्ष व जिल्हाप्रमुख म्हणून मी त्यांचा आदर करत आहे. मी शिवसेना वाढीसाठी करमाळा तालुक्यात काम करत असून पक्ष संघटना बांधणीसाठी मला सर्वांचे सहकार्य लाभणार आहे त्यामुळे कुणाशी भांडण करण्याचा माझा व माझ्या कार्यकर्तेचा प्रश्नच येत नाही . त्यामुळे माझा व माझ्या भगिनी रश्मी दिदी बागल यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही याबाबत मी कुठल्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. जरी मला पक्षाचे काम करत असताना या गोष्टीचा त्रास होत असेल तरी मी एकनाथ शिंदेचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून करमाळा तालुक्यात शिवसेनेचे काम प्रामाणिकपणे करत राहणार आहे. शिवसेना कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही . माझा माझे नेते एकनाथ शिंदे त्यांच्यावर ठाम विश्वास असून शिवसेनेचे काम जोमाने करणार असुन नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago