Categories: करमाळा

करमाळा तालुक्यातील सीना कोळगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांना बुडीत झालेल्या शेत जमिनीच्या नुकसान भरपाई देण्यासाठी रक्कम रु 9,71,95,000 एवढा वाढीव मोबदला मंजूर-सतीश बापू नीळ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील सीना कोळगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांना बुडीत झालेल्या शेत जमिनीच्या नुकसान भरपाई देण्यासाठी रक्कम रु 9,71,95,000 एवढा वाढीव मोबदला मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती श्री मकाई सह साखर कारखाना संचालक व सीना कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश नीळ पाटील यांनी दिली. पुढे बोलताना श्री नीळ यांनी सांगितले की, सीना कोळगाव धरण प्रकल्पा साठी मौजे निमगाव (ह) येथील शेतकऱ्यांच्या शेत जमिनी संपादित करण्यात आलेल्या आहेत. त्यांना नुकसान भरपाई ची रक्कम हि अत्यंत तुटपुंजी स्वरूपात देण्यात आली होती त्यामुळे धरणग्रस्त शेतकरी बांधवांनी भू संपादन अधिनियम १८९४,कलम २८ अ खाली वाढीव मोबदला मिळावा म्हणून अँड. सूर्यकांत सरडे यांच्या मार्फत दावे दाखल करण्यात आले होते. त्यानुसार मा.कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी , मा.जयश्री आव्हाड उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डुवाडी यांनी सदरील दावे मंजूर केले आहेत. त्याची रक्कम रु 9 कोटी 71 लाख 95 हजार रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात यावा असे कार्यकारी अभियंता, सीना कोळगाव प्रकल्प विभाग परांडा यांना कळविले आहे.
याकामी ग्रामीण विकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल, शिवसेना नेते दिग्विजय बागल यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. सदरील निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा व बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली.
तसेच शेवटी श्री नीळ यांनी राज्याचे ग्राम विकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल व शिवसेना नेते दिग्विजय भैय्या बागल व ॲड. सूर्यकांत सरडे यांचे मनःपूर्वक आभार मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

7 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

20 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

23 hours ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago