Categories: करमाळा

करमाळा भुसार व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी विक्रांत मंडलेचा

करमाळा प्रतिनिधी करमाळा भुसार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्षपदी विक्रांत मंडलेचा, उपाध्यक्षपदी मयूर दोशी ,सचिव पदी प्रीतम लुंकड व सहसचिव पदी उत्कर्ष गांधी यांची एकमताने निवड करण्यात आली .यावेळी मावळतेअध्यक्ष विजयकुमार दोशी, उपाध्यक्ष अनिल कुमार सोळंकी ,सचिव मिलिंद दोशी यांचे सह सर्व व्यापारी उपस्थित होते . निवडी नंतर करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना त्यांच्या भावी कारकीर्दि साठी शुभेच्छा दिल्या . यावेळी माजी आमदार जगताप यांनी करमाळा बाजार समितीचे नावलौकिक टिकवून ठेवण्यामध्ये व्यापारी वर्गाची भूमिका महत्त्वाची असून शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावा असे आवाहन केले .तसेच नूतन पदाधिकाऱ्यांच्या हातून शेतकरी हिताचे काम व्हावे अशा शुभेच्छा दिल्या .यावेळीअर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी, माजी नगराध्यक्ष अमोद संचेती,बाजार समितीचे संचालक परेशकुमार दोशी ,मनोज पितळे,बाळासाहेब पवार,माजी संचालक संतोष वारे ,सुनील मेहता,कृषी अधिकारी देवराव चव्हाण ,व्यापारी राजेंद्र चिवटे,गोरख ढेरे ,कालिदास लोंढे ,विलास जाधव, विपुल शहा,पप्पू कटारिया, शिरीष व्होरा,गिरीश दोशी,आशिष बोरा,जयराज चिवटे प्रवीण कुटेआदी उपस्थित होते .आभार बाजार समिती सचिव विठ्ठल क्षिरसागर यांनी मानले .

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

6 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

6 days ago