करमाळा प्रतिनिधी
करुणा सेवा समिती मुंबई यांच्या वतीने आळजापूर येथील पूरग्रस्त भागातील सर्व विद्यार्थ्यांना भांडी किटनवीन ब्रॅण्डेड कपडे
शैक्षणिक साहित्य व पालकांना किराणा साहित्य देण्यात आले.शिवसेनेचे युवा नेते शंभूराजे जयवंतराव जगताप यांच्या शुभहस्ते या किटचे वाटप करण्यात आले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे,उपतालुकाप्रमुख डॉक्टर गौतम रोडे
प्रशांतराजे भोसले,वैद्यकीय कक्ष प्रमुख नागेश दादा चेंडगे
युवासेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत राखुंडे,रंभापुरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना शंभूराजे जगताप म्हणाले की शिवसेनेचे वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख चिवटे शिवसेनेचे वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी आपल्या करमाळा तालुक्यातील तेरा गावे सीना नदीच्या पुरामुळे उध्वस्त झाले असून त्यांना मदत देण्याची मागणी करूनच सेवा समिती यांच्याकडे केली होती.या समितीच्या माध्यमातून आलेले साहित्य बिटरगाव आळजापूर निलज खांबेवाडी आवाटी बोरगाव पोटेगाव या गावात मोठ्या प्रमाणावर हे साहित्य वाटण्यात आले
करुणा सेवा समितीने दिलेले सामान करमाळ्यातील पूरग्रस्तांसाठी मोठा आधार ठरला असून या संस्थापक अध्यक्ष उदय चंद्र राणा यांचे सर्वजण आभारी आहेत.या पुढील काळात सुद्धा पूरग्रस्त भागातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्यासाठी करुणा सेवा समिती व शिवसेना कटिबद्ध असल्याचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी सांगितले .
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…