Categories: करमाळा

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 10 व्या मुळव्याध संबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आज रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी मुळव्याध संबंधीच्या आजाराविषयी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिराचे आयोजन मुळव्याध आजारासंबंधी महाराष्ट्र राज्यामध्ये नामांकित असलेले डॉ श्री प्रदीप तुपेरे साहेब व त्यांचे समवेत असलेले नामांकित डॉक्टर व त्यांची टीम यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित शिबिराचे आयोजन केले होते सदर शिबिरामध्ये 86 रूग्णांनी सहभाग नोंदवला मुळव्याध संबंधीच्या आजाराविषयी विविध तपासण्या करून काही ऑपरेटिव्ह असणाऱ्या नागरिकांचे ऑपरेशन करण्यात आले या सर्व सुविधा नाममात्र दरामध्ये या शिबिरामध्ये देण्यात आल्या जाधव -पाटील हॉस्पिटलचे सर्वेसर्वा असणारे डॉ रोहन पाटील यांच्या आई कमला भवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित केले होते सदर शिबिरामध्ये 86 रुग्णांनी तपासणी करून घेतली त्यासाठी जाधव -पाटील हॉस्पिटल मधील त्यांचे डॉक्टर्स व संबंधित कर्मचारी यांनी सहकार्य करून नागरिकांना उत्तम अशी सेवा देण्यात आली जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये इथून पुढेही करमाळा तालुक्यातील नागरिकांसाठी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रोगासंबंधीच्या शिबिरांचे आयोजन करण्याचा मानस असल्याचे नमूद केले शिबीर यशस्वी होण्यासाठी सचिव श्री अभिजित पाटील, डॉ शिवानी पाटील, श्री अजिंक्य पाटील, श्री तात्यासाहेब जाधव, श्री प्रमोद जगदाळे, श्री महादेव भोसले, श्री राहूल जाधव यांनी प्रयत्न केले .त्याचबरोबर आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक, आरोग्य विषय व शैक्षणिक सेवा देण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून केले जाईल याचा लाभ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना होईल असे डॉ रोहन पाटील यांनी सांगितले आहे ‌

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

19 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

23 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago