Categories: करमाळा

श्री मकाई कारखाना यावर्षी कामगारांची दिपावली गोड करणार-दिनेश भांडवलकर


करमाळा (प्रतिनिधी): तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखाना यावर्षी कामगारांची दिपावली गोड करणार असून गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये कामावर हजर असणाऱ्या सर्व कामगारांना ८.३३ टक्के बोनस देणार असून सदरची रक्कम ही संबंधित कामगारांना दिपावली सणापूर्वी अदा केली जाणार असल्याची माहिती कारखान्याचे विद्यमान चेअरमन दिनेश अंबादास भांडवलकर यांनी दिली. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक व जनरल मॅनेजर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना चेअरमन दिनेश भांडवलकर म्हणाले की, करमाळा तालुक्याच्या मा. आमदार शामलताई बागल (मामी), आमच्या मार्गदर्शिका, महाराष्ट्र भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा रश्मी (दिदी) बागल, श्री मकाई कारखान्याचे मा. चेअरमन दिग्विजय दिगंबरराव बागल यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा कारभार अत्यंत काटकसरीने व नियोजनबद्ध सुरू असून मकाई कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक सभासद व कामगारांच्या हिताचा विचार केलेला आहे.
मागील दोन वर्षांत सोलापूर जिल्ह्यासह कारखाना कार्यक्षेत्रात झालेल्या अत्यल्प पावसामुळे व आर्थिक अडचणीमुळे कारखाना गळीत हंगाम २०२३-२४ व २०२४-२५ सुरू करू शकला नाही. परंतु आमच्या मार्गदर्शिका, महाराष्ट्र भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा रश्मी (दिदी) बागल यांच्या प्रयत्नामुळे आता कारखान्याची आर्थिक अडचण संपलेली असून यापुढील काळात कारखान्याची गाळप क्षमता विस्तारीकरण करून जास्तीत जास्त गाळप करून इतर कारखान्याच्या स्पर्धेत ऊस दर देण्याचा कारखाना व्यवस्थापनाचा मानस असल्याचे मत चेअरमन यांनी यावेळी व्यक्त केले.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

28 mins ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

20 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

23 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago