Categories: करमाळा

केत्तुर पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण जागा- ॲड. अजित विघ्ने यांचे नावाची जोरदार चर्चा

*
करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद पंचायत समिती करीता नुकतेच आरक्षण जाहीर झाले असुन करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील कोर्टी जिल्हा परिषद गटातुन केत्तुर व कोर्टी पंचायत समिती गण सुद्धा सर्वसाधारण करिता जाहीर झाले आहेत. जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला करिता राखिव असुन माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सवितादेवी राजेभोसले या तिसऱ्यांदा या जागेवर दावा सांगतील तर त्यांचे विरुद्ध जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांचे सुविदय पत्नी यांचे उमेदवारीची चर्चा आहे. कोर्टी आणि केत्तुर पंचायत समिती गण हे देखिल सर्वसाधारण झाले असुन.. बदलत्या राजकीय समिकरणात अनेक राजकीय धुरीण आपले नशिब आजमवणार आहेत. सन-२०१२ साली पंचायत समिती निवडणुक अल्प मतांनी पराभुत झालेले पश्चिम भागातील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने( केत्तुर) हे पंचायत समिती केत्तुर गणात दावेदार असलेचे बोलले जात असुन, ते केत्तुर गावचे माजी उपसरपंच होते तर त्यांचे पत्नी देखिल केत्तुर गावच्या माजी सरपंच होत्या.सर्व सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग महत्वाचा असतो. केत्तुर -१ ते केत्तुर -२ आणि पोमलवाडी ते केत्तुर -२ पुलाचे कामात त्यांनी महत्वपूर्ण भुमिका बजावली असुन पारेवाडी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाडयांना थांबा मिळवणे करिता त्यांनी केलेला संघर्ष चर्चेत आहे. याशिवाय केत्तुर व परिसरात सामाजिक, राजकीय माध्यमातुन ते सतत कार्यरत असुन, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य म्हणुन त्यांनी उत्तम काम केले आहे. ते माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे प्रबळ दावेदार असुन, माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे गटातुन त्यांनी २०१२ साली पंचायत समिती निवडणुक लढवली आहे. त्यांचे माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी मंत्री दिगंबरराव बागल, शिवसेना नेते शिवाजीराव मांगले, माजी आमदार. नारायण पाटील यांचेशी सलोख्याचे संबध राहीलेले आहेत. त्यांचे मित्र परिवारात सध्या त्यांचे उमेदवारी विषयी प्रचंड चर्चा असून, याबाबत त्यांचेशी संपर्क साधला असता. माजी आमदार संजयमामा व सर्व कार्यकर्त्याशी विचारविनिमय करून केत्तुर पंचायत समिती गणातुन निवडणुक लढविणे विषयी इच्छुक असल्याचे सांगितले. वकीलीचे माध्यमातुनही त्यांचा जनसंपर्क असुन, त्यांचे पाठीशी वाढता जनाधार लक्षात घेता ते केत्तुर पंचायत समिती गणातील प्रबळ दावेदार असल्याची चर्चा आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

6 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

6 days ago