Categories: Uncategorized

सुखी जीवनासाठी व्यसनमुक्त रहाणे आवश्यक : – न्यायाधीश घुगे

करमाळा प्रतिनिधी : – प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख महत्त्वाचे आहे. जर सुख मिळवायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीने जीवनामध्ये व्यसनमुक्त राहणे आवश्यक आहे, असे मत करमाळा न्यायालयातील वरीष्ठ स्तर न्यायाधीश व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस.एम. घुगे यांनी व्यक्त केले.
तालुका विधी सेवा समिती, करमाळा वकील संघ व करमाळा पंचायत समिती यांच्या वतीने पंचायत समिती सभागृहात आयोजनात कायदेविषयक शिबिरात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश ए. के. शर्मा, दुसरे सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती एस.पी. कुलकर्णी याशिवाय वकील संघाचे अध्यक्ष अॅड. आर.बी. निळ उपाध्यक्ष अॅड. अलीम पठाण यांच्यासह आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते डॉ. अॅड. बाबूराव हिरडे, ॲड. राहुल सावंत, ॲड . बलवंत राऊत, ॲड. प्रशांत बागल, ॲड. विक्रम चौरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना न्यायाधीश घुगे म्हणाले की, समाजामध्ये या ना प्रकारची व्यसने आहेत. त्यातून वेळ, पैसा व आरोग्य बरबाद होते. त्यामुळे निग्रह करून व्यसनमुक्त झाले पाहिजे. असे त्यांनी आवाहन केले तसेच जे दिव्यांग आहेत त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांची भाषा समजून घेणाऱ्या व्यक्तीचे नेमणूक केली असून त्यांना न्यायालयात न्याय दिला जातो. समाजामध्ये सक्षम माणसांनी प्रत्येक ठिकाणी दिव्यांग मंडळींना सहकार्य करावे असेही आवाहन केले.
यावेळी बोलताना अॅड. हिरडे यांनी व्यसनाचा आजार केवळ एका व्यक्तीचा नसून तो संपूर्ण परिवाराला झालेला आजार असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने व्यसनात पडण्यापूर्वी स्वतः सतर्क राहणं गरजेचं आहे एकदा व्यसनात पडल्यानंतर त्यातून बाहेर पडणे फार कठीण असते. त्यामुळे आपल्या उत्तम भविष्यासाठी व्यसनमुक्त रहाणे अवश्यक आहे.ॲड. राहुल सावंत यांनी नागरिकाचे मूलभूत कर्तव्य व शासकीय विविध योजना याबाबत सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. बी. आर. राऊत यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरीष्ठ लिपीक आर.पी. खराडे यांनी केले कार्यक्रमाचे आभार अॅड. विक्रम चौरे यांनी मानले. यावेळी पंचायत समितीचे कार्यालयीन अधीक्षक श्री जरांडे व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

श्री कमलाभवानी मंदिरात २ हजार महिलांचा दुर्गा सप्तशती पाठ भक्तिमय वातावरणात सहस्र श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवा; विश्वकल्याणासाठी सामूहिक प्रार्थना

करमाळा प्रतिनिधी श्रीदेवीचा माळ येथील श्री जगदंबा कमलादेवी मंदिरात सहस्र श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवेचे…

11 hours ago

नेरलेची एसटी आठ दिवसांत सुरू करा; अन्यथा ठिय्या आंदोलन औदुंबर राजेभोसले यांचा एसटी महामंडळाला इशारा; विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

करमाळा प्रतिनिधी करमाळा–कुर्डूवाडी–नेरले मार्गावर सुरू असलेली एसटी बससेवा अचानक बंद झाल्याने नेरले परिसरातील नागरिक, विद्यार्थी…

13 hours ago

करमाळ्यात १२ वा आंतरराष्ट्रीय सुरताल संगीत महोत्सव व पुरस्कार सोहळा

  करमाळा प्रतिनिधी : कमला भवानी बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या वतीने पं. के. एन. बोळंगे…

14 hours ago

करमाळा पोलिसांचा धडाका; १० लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त सोन्याच्या दागिन्यांची चोरी आणि मोटारसायकल चोरीचा छडा; दोन आरोपी अटकेत

करमाळा  प्रतिनिधी करमाळा शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशाच्या पर्समधून चोरीस गेलेल्या सुमारे १० लाख ५ हजार…

1 day ago

करमाळ्याच्या मुथा नॉलेज फाउंडेशनची आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत दमदार कामगिरी; 57 पैकी 48 विद्यार्थ्यांचा गौरव

  करमाळा प्रतिनिधी सात मिनिटांत 100 गणिते सोडविण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; प्रथम ते सहाव्या…

3 days ago

श्रावणात ‘हर हर महादेव’चा जयघोष; करमाळ्याचे श्री खोलेश्वर महादेव मंदिर भक्तीने उजळले पुरातन वास्तू, रथोत्सव आणि शिवनाम सप्ताहाची परंपरा आजही कायम

करमाळा  प्रतिनिधी श्रावण महिना हा भगवान महादेवाच्या भक्तीचा आणि उपासनेचा महिना मानला जातो. या पवित्र…

4 days ago