Categories: करमाळा

करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी ५०,०००/- रूपये किंमतीची चोरीच्या प्रकरणातील मोटार सायकल जप्त

:-

करमाळा प्रतिनिधी करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी ५०,०००/- रूपये किंमतीची मोटार सायकल जप्त केली आहे.यात हकिगत अशी कि, दि ०९/०९/२०२५ रोजी रात्रौ २१/३० वा ते दिनांक १०/०९/२०२५ वा ते पहाटे ०४/०० वा चे सुमारास फिर्यादी नामे ओंकार संजय जाधव वय २१ वर्षे रा केम ता करमाळा जि सोलापूर यांचे मालकीची हिरो कंपनीची मोटारसायकल ५०,०००/-रु किंमतीची काळा रंगावी हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल तिचा आर टी ओ नं. एम एच ४२ ए. यु ४३८९ चेसी नं. MBLHAR075JHB99229 व इंजिन नं. HA10AGJHBF7426 असा असलेली जु. वा. किं. अं. असा असलेली त्यांचे राहते घरा समोर केम ता. करमाळा जि सोलापुर येथून चोरी झालेबाबत दि. ११/०९/२०२५ रोजी करमाळा पोलीस ठाणेस गुरनं. ७५५/२०२५ बी एन एस कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

करमाळा पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण मागील काही महिन्यापासून पोलीस ठाणेचे हद्दीमध्ये मोटारसायकल चोरीचे गुन्हे वारंवार घडत असल्याने मा. पोलीस अधीक्षक, श्री अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक, श्री. प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस (भा.पो.से.), यांनी करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, श्री रणजीत माने यांना मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी आदेशीत केले होते त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री रणजीत माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरनण शाखेच्या अंमलदारांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

त्याप्रमाणे करमाळा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी मागावर असताना गोपनीय बातमीदार, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाआधारे सदरचा गुन्हा हा आरोपी नामे नामदेव बबन चुनाडे वय ५२ वर्षे रा अनिल नगर पंढरपुर ता पंढरपुर जि सोलापुर याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सदर आरोपी शोध कामी करमाळा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक रवाना झाले, गोपनिय बातमीदारामार्फत सदर आरोपी हा पंढरपुर शहरात फिरत असलेबाबत माहीती मिळाली असता सदर माहीतीच्या अनुषंघाने बातमीतील नमुद ठिकाणी पथक गेले असता आरोपी मिळुन आल्याने त्यास पकडून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदर मोटारसायकल चोरी केल्याची कबूली दिल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आले. आरोपी मजकूर याचे ताब्यातून ५०,०००/- रूपये किंमतीची काळा रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटार सायकल तिचा आर टी ओ नं. एम एव ४२ ए.यु ४३८९ मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्हयातील चोरीस गेलेली मोटारसायकल आरोपीकडून हस्तगत करण्यात आली आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेका /१८२८ भाउराव शेळके हे करत आहेत.सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक, श्री. प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अंजना कृष्णा व्ही.एस (भा.पो.से.), करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, श्री रणजीत माने यांचे मार्गदर्शनाखाली पोहेका / १६४८ अजित उबाळे, पोना/११६२ मनिष पवार, पोना/९१२ वैभव ठेंगल, पोकॉ/४३८ रविराज गटकुळ, पोकॉ/८५६ अर्जुन गोसावी, पोकॉ/६८९ येवले पोकॉ / २५ हनुमंत भराटे, पोकॉ/१५२४ अमोल रंदिल, पोकों / ९६१ गणेश खोटे तसेच सायबर पो ठाणे कडील पोहेकॉ/२२२ व्यंकटेश मोरे यांनी केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago