Categories: करमाळा

करमाळा नगरपरिषद निवडणूक करमाळा शहर विकास पॅनल पूर्ण ताकदीनिशी लढवणार-कुणाल पाटील

करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपरिषद निवडणूक करमाळा शहर विकास पॅनल पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याची माहिती मुख्य प्रवर्तक कुणाल (भैय्या )पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
नुकतीच वीस सदस्यांची व नगराध्यक्ष पदाची घोषणा निवडणूक आयोगाकडून झालेले आहेत. प्रभाग पद्धती व आरक्षण निश्चिती जाहीर झालेली आहे तरी आम्ही सर्व जागेवर उमेदवार देऊन विजय संपादन करणार आहोत.
लवकरच आम्ही जनतेच्या विकासाच्चा वचननामा जाहीर करणार आहोत.
विकासाचा वचननामा आणि भ्रष्टाचार विरहित समाजसेवक (नगरसेवक) शहराच्या विकासाच्या अनुषंगाने काम करतील. आतापर्यंत शहरातील दोन्ही तिन्ही गटांनी केवळ विकासाच्या गप्पा मारल्या. मूलभूत सोयी सुविधा मिळण्यापासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे.
आम्हाला सत्ता दिल्यास ज्याप्रमाणे अकलूज ,बारामती शहरे पूर्णपणे विकसित शहरे झालेले आहेत त्याचप्रमाणे विकासाचे मॉडेल करमाळा शहर होणार आहे. कोणताही नगरसेवक एक रुपयाचा ही भ्रष्टाचार करणार नाही.
जनतेच्या प्रश्नावरती प्रभागामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेऊन विकास आराखडा तयार केला जाईल.
शहरांमध्ये धुळीचे साम्राज्य, रस्त्याची दुरावस्था, पिण्याच्या पाण्याचे ढिसाळ नियोजन, रहदारी समस्या, स्वच्छता, उधान, टाऊन हॉल, फुटपाथ, हद्दवाढ भागामध्ये मूलभूत सुविधा या सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्यास भर राहणार आहे.
नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक पदासाठी समविचारी पॅनल उमेदवार उभे करून जनतेसमोर जाणार आहोत असे माहिती कुणाल ( भैय्या )पाटील यांनी दिली

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

5 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

1 day ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

1 day ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago