Categories: Uncategorized

देवळाली ग्रामपंचायत माजी सरपंच आशिष गायकवाड यांचा विजय हायकोर्टात आवटे यांचे रिट पिटीशन रद्द

देवळाली प्रतिनिधी देवळाली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व माजी आमदार संजय मामा शिंदे गटाचे प्रभावी कार्यकर्ते आशिष गायकवाड यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अपात्रतेचा दावा अखेर कोल्हापूर खंडपीठात फेटाळण्यात आला आहे. या निर्णयामुळे गायकवाड यांना मोठा न्याय मिळाला असून, ग्रामपंचायतीतील त्यांच्या पात्रतेचा निर्णय कायम राहिला आहे.ही संपूर्ण प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून सुरु होती. सुधीर आवटे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे आशिष गायकवाड यांच्याविरुद्ध ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरविण्याबाबत अर्ज दाखल केला होता. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निकालानंतर गायकवाड यांनी त्या निर्णयाविरोधात कमिशनर, पुणे विभाग यांच्याकडे अपील दाखल केले होते. सदर अपील कमिशनर यांनी मंजूर करत, गायकवाड पात्र असल्याचे घोषित केले होते.त्यानंतर सुधीर आवटे यांनी या निर्णयाविरोधात हायकोर्ट, खंडपीठ कोल्हापूर येथे रिट पिटीशन दाखल केले होते. मात्र न्यायालयाने संपूर्ण बाबींची सविस्तर छाननी केल्यानंतर आशिष गायकवाड यांच्या बाजूने निकाल देत, आवटे यांचे रिट पिटीशन फेटाळून लावले.या प्रकरणात ॲड. अजिंक्य गायकवाड व ॲड. ऋत्विक गाडगे यांनी आशिष गायकवाड यांचे कायदेशीर प्रतिनिधीत्व करत प्रभावी युक्तिवाद सादर केला. न्यायालयाच्या निर्णयामुळे देवळाली ग्रामपंचायतीतील गायकवाड यांचे राजकीय स्थान आणखी मजबूत झाले आहे.या निकालानंतर संजय मामा शिंदे गट तसेच कल्याण भाऊ गायकवाड युवा मंच, देवळाली यांच्या वतीने आशिष गायकवाड यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक कार्यात नेहमी आघाडीवर राहिलेल्या आशिष गायकवाड यांनी या विजयाबद्दल समाधान व्यक्त करत सांगितले की, “सत्य आणि न्याय नेहमीच विजय मिळवतो. माझ्यावर दाखल केलेले अपात्रतेचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित होते, मात्र न्यायालयाने वस्तुस्थिती ओळखून न्याय दिला आहे.”या निकालामुळे देवळाली ग्रामपंचायतीतील राजकीय समीकरणात उत्सुकता निर्माण झाली असून, समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

4 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

24 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

1 day ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago