Categories: करमाळा

प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने गरजू व गरीब लोकांना दिवाळी फराळ वाटप

करमाळा (प्रतिनिधी) – प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने करमाळा शहरांमधील गरजू, अनाथ, व गरीब लोकांना दिवाळीनिमित्त मिठाई व फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कांबळे बोलताना म्हणाले कि प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान तर्फे आम्ही वर्षभर समाजातील गरीब अनाथ असाहाय्य वंचित घटकांसाठी काम करत असतो दिवाळी हा सण वर्षातील खूप मोठा सण असून या सणाला सर्व लोक खूप उत्साहाने साजरा करत असतात परंतु समाजातील उपेक्षित वंचित गरीब लोकांना अशा आनंदा पासून वंचित राहावे लागते त्यामुळे आम्ही समाजातील गरीब वंचित लोकांच्या चेहऱ्यावर या छोट्याशा मदतीच्या माध्यमातूनआनंद फुलवण्याचा प्रयत्न करतो. असे कांबळे बोलताना म्हणाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे उपजिल्हा रुग्णालयाचे ओएसडी कपिल भालेराव, विभूतेसर, आदी सह विविध मान्यवर उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

13 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

17 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

18 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago