Categories: करमाळा

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या सांज पहाट कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार


करमाळा, प्रतिनिधी – दिवाळी निमित्त करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाऊंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा. डॉ. महेश निकत यांच्यातर्फे आयोजित स्वरदीप सांज पाडवा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार दि.२२ रोजी सायं.७ ते रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात श्रोत्यांना संगीताच्या मेजवानीसह विविध क्षेत्रातील व्यक्ती व संस्था यांना मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

शहरातील गणेश नगर येथील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारती समोरील प्रांगणात या कार्यक्रमाला सुरुवात झाली. दीप प्रज्वलना नंतर संदीप पाटील प्रस्तुत स्वरदीप सांज पाडवा या कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या भावगीते, भक्तिगीते, देशभक्तीपर गीते यांच्यासह बहारदार जुन्या-नव्या मराठी-हिंदी चित्रपटातील गीतांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. या सोबतच करमाळा शहरातील डॉ. रविकिरण पवार, डॉ. लोकरे, डॉ.बिपिन परदेशी, डॉ.अमोल आणि सौ.स्वाती घाडगे, डॉ.विशाल शेटे, डॉ. विनोद गादीया, पंचायत समितीचे माजी उपसभापती पै. दत्ता सरडे आदींनीही या संगीत मैफिलीत आपली गायन कला तर प्रा.नागेश माने यांनी सुरेल बासरी वादन सादर केले.

या कार्यक्रमा दरम्यान करमाळा शहर व तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, वैद्यकीय, कृषी, क्रिडा, सांस्कृतिक, क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीराम प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना (करमाळा), मराठा फोर्ट्स : दुर्ग भ्रमंती व दुर्ग जागर (करमाळा) आणि श्री नागनाथ लेझिम मंडळ (शेटफळ, ता .करमाळा), डॉ. श्रीराम परदेशी, डॉ. विशाल शेटे, पत्रकार नासीर कबीर, सिद्धार्थ वाघमारे आणि विशाल परदेशी, युवराज मगर (सरपंच, उंदरगाव), सौ. परवीन खान (सरपंच, आवाटी), त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब (करमाळा)चे सागर शिरसकर, वीर शिवाजी महाराज तलवार बाजी ग्रुप (करमाळा)चे प्रशिक्षक नागनाथ बोळगे, आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू आश्लेषा बागडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (उमरड), नामसाधना प्राथमिक विद्यामंदिर (मुलांची शाळा नं.१, करमाळा), साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा नं.१, करमाळा), श्री छत्रपती शिवाजी विद्यालय (वीट, ता.करमाळा), त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कोकाटे जुनियर कॉलेज (टाकळी,ता.करमाळा), लोकमान्य टिळक गणेश उत्सव मंडळ (फंड गल्ली, करमाळा), छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ (सावंत गल्ली, करमाळा), गणेश कॉम्प्युटर (करमाळा), दिशा कॉम्प्युटर सेंटर (करमाळा), वर्ल्ड कॉम्प्युटर सेंटर (करमाळा), इनडिवाइस रिसर्चचे अध्यक्ष सत्यशोधन पाटील आणि हरिहर ॲग्रो (वीट)चे रणजीत निंबाळकर यांचा मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, आफसर जाधव, श्रेणीक खाटेर व सौ. संगीता खाटेर, प्रताप जगताप, कवी प्रकाश लावंड, डॉ. अजिंक्य पवार आणि शहरातील सर्व डॉक्टर्स, जेष्ठ पत्रकार अशपाक सय्यद, ग्राहक पंचायतच्या माधुरी काकी परदेशी यांच्यासह शहरातील अनेक नागरिक श्रोते उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago