Categories: करमाळा

26 ऑक्टोबर रोजी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद/नगरपंचायत तसेच पदवीधर मतदार नोंदणी याबाबत आढाव बैठक-भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा पवार गट ) तसेच संजयमामा शिंदे गटाच्या सर्व कार्यकर्त्यांना कळविण्यात येते की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनिलजी तटकरे साहेब तसेच कृषीमंत्री तथा सोलापुर जिल्ह्याचे संपर्कमंत्री मा.ना.श्री. दत्तामामा भरणे साहेब, यांच्या सुचनेनुसार मा.उमेश पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद/नगरपंचायत तसेच पदवीधर मतदार नोंदणी याबाबतचा आढावा पक्ष श्रेष्ठींना देण्याकरीता उद्या *दिनांक 26/ 10 /2025 रोजी दुपारी 1 ते 4 या वेळेत विठ्ठल निवास ,बायपास रोड, माजी आमदार संजयमामा शिंदे संपर्क कार्यालय* येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन, सदर बैठकीला तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, आजी-माजी तालुकाध्यक्ष, सर्व सेलचे तालुकाप्रमुख, नगराध्यक्ष, नगरसेवक, जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व कार्यकारणी महिला पदाधिकारी व इच्छुक उमेदवार यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago