Categories: करमाळा

करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढवणार असून विजयाची शाश्वती असणाऱ्यांना उमेदवारी देणार-उमेश पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस*

           

*करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढवणार असून महायुतीच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका संदर्भात आढावा बैठक इच्छुकांच्या मुलाखती करमाळा येथे संपन्न झाल्या ‌ यावेळी अजित दादा पवार सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालय येथे करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा तालुका अध्यक्ष भरत भाऊ आवताडे ‌ राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड , माजी तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील, कार्याध्यक्ष सुजित तात्या बागल, तालुका प्रवक्ते ॲड अजित विघ्ने , डॉ. गोरख गुळवे प्रदेश सदस्य बाळकृष्ण सोनवणे, तालुका उपाध्यक्ष अमोल फरतडे,सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारणी सदस्य चंद्रकांत काका सरडे,जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार ‌ राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अजिंक्य पाटील ,उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष प्रसाद जगताप युवक तालुकाध्यक्ष किरण फुंदे‌ लेबर फेडरेशन संचालक मानसिंग खंडागळे राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ नंदिनीताई लुंगारे तरटगाव माजी सरपंच अभिजीत पाटील उपस्थित होते: यावेळी पुढील यावेळी पुढे बोलताना सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील म्हणाले की करमाळा तालुक्यात जरी गट तट असले तरी महायुतीच्या माध्यमातून आपण महायुतीच्या घटक पक्षातील उमेदवार आपल्या पक्षांमध्ये प्रवेश करून जे निवडणूक लढवण्यास तयार असेल तर त्याला नक्कीच उमेदवारी देऊ परंतु आपला उमेदवार निवडून येणारा तुल्यबळ असेल तर आम्ही त्या उमेदवारांना प्राधान्य देऊन उमेदवारी देणार आहोत .महायुतीच्या घटक पक्षाने आम्हाला सहकार्य केले तर त्यांच्या उमेदवारांनाही आम्ही नक्की सहकार्य करून महायुतीचा धर्म पाळणार आहोत. करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद गट पंचायत समिती गट यामधील खुल्या सर्वसाधारण जागेसाठी चार ते पाच उमेदवार इच्छुक असून आरक्षित जागेसाठी दोन ते तीनच उमेदवार इच्छुक आहेत त्यामुळे सर्व घटक पक्षांना तसेच गटातील माणसाचा विचार घेऊन उमेदवार निवडून येण्याच्या परिस्थितीचा विचार करून विजयी होणाऱ्या उमेदवारालाच प्राधान्याने उमेदवारी देणार असून सर्वसाधारण जागेसाठी जरी सर्वसाधारण इतर प्रवर्गातील उमेदवार असेल पण तो निवडून येणार असेल तर त्याला आम्ही उमेदवारी देणार आहे .नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भातही लवकरच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका निवडणुकीमध्ये माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी कामाला लागून पक्षाचे मताधिक्य वाढवण्यासाठी पक्षाला या निवडणुकीत यश मिळवून देण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा तालुका अध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांनी आढावा बैठकीचे प्रास्ताविक केले स्वागत युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी केले तर आभार राष्ट्रवादी काँग्रेचे जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago