Categories: करमाळा

शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच करमाळा नगरपालिका जिंकणार – वैभवराजे जगताप

 

करमाळा प्रतिनिधी
शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेचे माजी आमदार जयवंतराव जगताप माजी आमदार शहाजी बापू पाटीलसोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख महेश नाना साठे
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा नगरपालिका धनुष्यबाणावर सर्व जागा स्वबळावर लढवणार असून करमाळा नगरपालिकेवर भगवा फडकणारच असा विश्वास माजी नगराध्यक्ष वैभव राजे जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे
तालुकाप्रमुख अनिल पाटील शहरप्रमुख संजय शीलवंत
युवासेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत राखुंडे उपतालुकाप्रमुख गौतम रोडे तालुका समन्वयक राहुल कानगुडे आधी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना वैभव राजे जगताप म्हणाले की
स्वातंत्र्य सैनिक देशभक्त कैलासवासी नामदेवराव जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून करमाळा तालुक्यातील जनतेने जगताप कुटुंबावर कायमस्वरूपी प्रेम केले आहे.शिवसेना माजी आमदार जयवंतराव जगताप यांना मानणारा मोठा मतदार असून
अठरापगड जातीला बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून जयवंतराव जगताप यांच्या पाठीशी मुस्लिम समाज व दलित समाज शंभर टक्के उभा राहतो हा इतिहास आहेएकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने महाराष्ट्राला एक संवेदनशील व आशादायक नेतृत्व मिळाले आहे.
एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने संपूर्ण तालुक्यातील शिवसैनिक कामाला लागले असून मोठ्या ताकतीने ह्या सगळ्या निवडणुका जिंकून करमाळा नगरपालिकेची उर्वरित विकासाची कामे मार्गी लावणार आहोत.करमाळा नगरपालिकेतील वीस जागेसाठी जवळपास शंभर ते दीडशे कार्यकर्ते धनुष्यबाणावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून नगराध्यक्ष पदासाठी सहा ते सात उमेदवार शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची इच्छुक आहेतकरमाळा शहरातील 20 वार्डात शिवसेनेची भक्कम शाखा बांधणी केली असून तालुक्यातील 118 गावात संघटन तयार केले आहे.जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या सर्व निवडणुका धनुष्यबाण चिन्हावरच एकतर्फी लढविण्यात येणार असून लवकरच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत निवडणुकीच्या आधी शिवसैनिकांचा मेळावा घेणार असल्याचे वैभवराजे जगताप यांनी शेवटी सांगितलें आहे.शिवसेनेत काम करणाऱ्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला व जनतेची सेवा करण्याची प्रामाणिक तळमळ असलेल्यांनाच उमेदवारी देणार असल्याचे धोरण शिवसेना माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे असून निश्चितच नगरपालिका जिंकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago