Categories: करमाळा

शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच करमाळा नगरपालिका जिंकणार -वैभवराजे जगताप

करमाळा प्रतिनिधी
शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेचे माजी आमदार जयवंतराव जगताप माजी आमदार शहाजी बापू पाटील,सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख महेश नाना साठे
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे,यांच्या नेतृत्वाखाली करमाळा नगरपालिका धनुष्यबाणावर सर्व जागा स्वबळावर लढवणार असून करमाळा नगरपालिकेवर भगवा फडकणारच असा विश्वास माजी नगराध्यक्ष वैभव राजे जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे तालुकाप्रमुख अनिल पाटील शहरप्रमुख संजय शीलवंत,युवासेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत राखुंडे,उपतालुकाप्रमुख गौतम रोडे तालुका समन्वयक राहुल कानगुडे आधी पदाधिकारी उपस्थित होतेयावेळी बोलताना वैभव राजे जगताप म्हणाले की स्वातंत्र्य सैनिक देशभक्त कैलासवासी नामदेवराव जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून करमाळा तालुक्यातील जनतेने जगताप कुटुंबावर कायमस्वरूपी प्रेम केले आहे.शिवसेना माजी आमदार जयवंतराव जगताप यांना मानणारा मोठा मतदार असून अठरापगड जातीला बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून जयवंतराव जगताप यांच्या पाठीशी मुस्लिम समाज व दलित समाज शंभर टक्के उभा राहतो हा इतिहास आहे.
एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने महाराष्ट्राला एक संवेदनशील व आशादायक नेतृत्व मिळाले आहे.एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने संपूर्ण तालुक्यातील शिवसैनिक कामाला लागले असून मोठ्या ताकतीने ह्या सगळ्या निवडणुका जिंकून करमाळा नगरपालिकेची उर्वरित विकासाची कामे मार्गी लावणार आहोत.करमाळा नगरपालिकेतील वीस जागेसाठी जवळपास शंभर ते दीडशे कार्यकर्ते धनुष्यबाणावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून नगराध्यक्ष पदासाठी सहा ते सात उमेदवार शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची इच्छुक आहेत.करमाळा शहरातील 20 वार्डात शिवसेनेची भक्कम शाखा बांधणी केली असून तालुक्यातील 118 गावात संघटन तयार केले आहे
जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या सर्व निवडणुका धनुष्यबाण चिन्हावरच एकतर्फी लढविण्यात येणार असून लवकरच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत निवडणुकीच्या आधी शिवसैनिकांचा मेळावा घेणार असल्याचे वैभव राजे जगताप यांनी शेवटी सांगितलें आहे.शिवसेनेत काम करणाऱ्या एकनिष्ठ कार्यकर्त्यालाव जनतेची सेवा करण्याची प्रामाणिक तळमळ असलेल्यांनाच उमेदवारी देणार असल्याचे धोरण शिवसेना माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे असून निश्चितच नगरपालिका जिंकणारच असा विश्वास व्यक्त केला आहे.

 

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

28 mins ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

5 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

10 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

17 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

1 day ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

1 day ago