Categories: करमाळा

समाजसेवा व विकासाचा महामेरू – गणेशभाऊ चिवटे वाढदिवस विशेष


समाजसेवा, विकास, आणि तरुणाईसाठी आदर्श ठरलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे गणेशभाऊ चिवटे. ३० ऑक्टोबर १९८३ रोजी सुनीता आणि नागनाथ चिवटे यांच्या पोटी जन्मलेले गणेशभाऊ हे धार्मिक संस्कार आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचे वारसदार आहेत. शिक्षण B.Com पर्यंत घेत असतानाच त्यांना समाजकारणाची गोडी लागली आणि तरुण वयातच त्यांनी संघटन बांधणीचे मोठे कार्य हाती घेतले.वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी बजरंग दल संघटनेच्या करमाळा तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. या काळात त्यांनी तालुक्यातील ६० ते ७० गावांमध्ये हिंदुत्ववादी तरुणांची एक मजबूत फळी उभी केली. पोथरे गावातून पहिल्या शाखेची सुरुवात करून संघटन कार्याला दिशा दिली.संघटन बळावर त्यांनी वयाच्या केवळ २५व्या वर्षी करमाळा नगरपालिकेत सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवडून येत लोकसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. या कार्यकाळात त्यांनी नगरातील विकासकामांबरोबरच लोकांशी थेट संपर्क ठेवून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले.संघटन अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी तरुणांना दुग्धव्यवसायासारख्या स्वावलंबी क्षेत्राशी जोडले. त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य निर्माण झाले. या उपक्रमामुळे संघटनेला आणि समाजाला नवीन बळ मिळाले.यानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांच्या नेतृत्वगुणांची दखल घेत त्यांना भाजप करमाळा तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यांनी या पदावर राहून शासनदरबारी लोकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले.२०१८ मधील शेतकरी कर्जमाफी योजनेत अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळण्यात अडचणी आल्या. त्यावेळी गणेशभाऊंनी स्वतःच्या पैशातून शेकडो शेतकऱ्यांना मदत करून कर्जमाफीचा लाभ मिळवून दिला — ही त्यांची शेतकरीप्रेमी वृत्ती दाखवणारी घटना ठरली.करमाळा तालुक्यात ऊस तोडणी नियोजन कोलमडले असताना त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या माध्यमातून शेकडो शेतकऱ्यांचा ऊस स्वराज साखर कारखान्यात देऊन दिला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व इतर वित्तीय सेवा संस्थांमधून दुग्धव्यवसायासाठी मदत मिळवून दिली.मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी सोलापूर येथे भव्य मोर्चाचे नेतृत्व केले. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्यात गणेशभाऊ दोन वेळा स्वतःचा वाढदिवस सोहळा रद्द करून समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.कोल्हापूर भागातील पूरपरिस्थितीत तेथील लोकांना मदतीचा हात देत त्यांनी खरी समाजसेवा दाखवून दिली. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना आरोग्यसेवा, रेमडिसिवीर इंजेक्शन पुरवून मदत केली.केवळ समाजकारणच नव्हे तर क्रीडा आणि अध्यात्म क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तालुकास्तरीय भजन स्पर्धा घेऊन वारकरी परंपरेला प्रोत्साहन दिले. कुस्ती क्षेत्रासाठी आखाडे भरवले, आणि करमाळ्यात आधुनिक व्यायामशाळा उभारून अनेक तरुण मल्लांना घडवण्याचे पवित्र कार्य हाती घेतले आहे.त्यांच्या अफाट जनसंपर्कामुळे आणि कार्यक्षमतेमुळे भाजपने त्यांच्यावर विश्वास ठेवून जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली. तसेच सोलापूर जिल्हा नियोजन मंडळावर काम करण्याची संधी दिली. त्यांनी या पदावरून करमाळा तालुक्यात तब्बल २५ कोटी रुपयांचा विकासनिधी खेचून आणला ही त्यांच्या कार्यकौशल्याची साक्ष लोकांना दिली आहे.गणेशभाऊंच्या व्यक्तिमत्त्वातील संवादकौशल्य, सर्व समाजघटकांशी असलेले सौहार्दपूर्ण नाते आणि लोकसेवेची निष्ठा ही त्यांची खरी ओळख आहे. त्यामुळेच आज गणेशभाऊ चिवटे हे केवळ राजकारणी नसून जनतेच्या मनातील ताईत बनले आहेत.करमाळा तालुक्यातील विकास, तरुणांचे सक्षमीकरण, आणि सामाजिक ऐक्य या तीनही क्षेत्रांत त्यांनी दाखवलेले नेतृत्व आदर्शवत आहे.त्यांच्या ३० ऑक्टोबर रोजीच्या वाढदिवसानिमित्त सर्व समाजघटकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात शुभेच्छाचा वर्षाव होत आहे ही त्यांनी आजवर केलेल्या कामाची पोचपावती आहे. अशा या दिलदार समाजसेवक व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
@लेखक – नितीन(भाऊ) झिंजाडे
सरचिटणीस भारतीय जनता पार्टी, करमाळा, संपादक रियल न्युज नेटवर्क (पोर्टल)

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

12 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

14 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

2 days ago