Categories: करमाळा

डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता योजनेचे निकष ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेलाही लागू करावेत.-प्रा. रामदास झोळ सर

करमाळा प्रतिनिधी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा ओबीसी उप समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी भेट घेऊन खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांनाही वस्तीग्रह भत्त्याची योजना लागू करावी अशी मागणी केली या मागणीमध्ये डॉ.पंजाबराव देशमुख वस्तीग्रह निर्वाह भत्ता ही योजना खुला प्रवर्ग, एसइबीसी, इ डब्ल्यू एस तसेच विद्यार्थ्यांना शहरी व ग्रामीण भागासाठी सरसकट लागू होते व त्याची उत्पन्न मर्यादेची अट हि रक्कम ८००००० रुपये एवढी असून सदर योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील सादर करता येतो व त्या उलट इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ मिळत असून ही योजना फक्त शहरी भागासाठी लागू असून उत्पन्न मर्यादेची अट ही रक्कम २५०००० रुपये एवढी आहे तसेच सदर योजनेसाठी प्रति जिल्हा फक्त ६०० विद्यार्थी मर्यादा असून त्याचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सादर करावा लागतो.
तरी अशा पद्धतीने दोन्ही वस्तीग्रह योजनांमध्ये असलेली तफावत दूर करून डॉक्टर पंजाबराव देशमुख वस्तीग्रह निर्वाह भत्ता या योजनेप्रमाणे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधारित योजना ही शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागातील विद्यार्थ्यांना सरसकट लागू करावी तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना महाडीबीटी पोर्टलवर घेऊन त्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची प्रक्रिया लागू करण्याबाबत सकारात्मक विचार करून इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना सहकार्य करावे. अशी मागणी प्रा.रामदास झोळ सर यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा ओबीसी उप समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना केली. यावेळी बावनकुळे साहेबांनी हा विषय लवकरच बैठकीमध्ये मांडून याची अंमलबजावणी करू असे आश्वासित केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

6 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

6 days ago