Categories: करमाळा

फलटणच्या महिला डॉक्टरच्या मृत्यूचा योग्य पद्धतीने तपास होऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी या मागणीसाठी करमाळा तहसीलदार यांना निवेदन

करमाळा प्रतिनिधी ता. ३१:* फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या मृत्यूचा योग्य पद्धतीने तपास होऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी. या मागणीसाठी करमाळा येथे आज रोजी विविध संस्था, संघटनांतर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये पुढील मागण्या करण्यात आल्या १) फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मृत्यूची चौकशी विशेष तपास यंत्रणेमार्फत म्हणजेच एसआयटी मार्फत करण्यात यावी, २) सरकारने प्रशासन अथवा राजकीय क्षेत्रातील दोषींना पाठीशी घालू नये, ३) महिला डॉक्टर मृत्यूचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा, ४) मृत महिला डॉक्टरच्या व कायमच पीडित महिलांविरोधात बोलणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना पदावरून ताबडतोब हटवण्यात यावे. वरील मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांतर्फे देण्यात आला.याप्रसंगी ऍड.सविता शिंदे, डॉ. अमोल दुरंदे, अमरजीत साळुंखे, हनुमंत मांढरे, सुधाकर लावंड, साहेबराव वाघमारे, राजाभाऊ कदम, यशपाल कांबळे, उत्तरेश्वर कांबळे, पद्मजा इंगवले, विजयमाला चवरे, प्रा. गोवर्धन चवरे, दादा ढेरे, दादासाहेब लबडे, अंगद देवकते, चंद्रकांत साळवे, प्रमोद कुंभार, शहाजी धेंडे, ऍड. अलीम पठाण, डॉ. राम बिनवडे, डॉ. बालाजी खटके, डॉ. संतोष आटोळे, डॉ. वर्षा करंजकर, औदुंबर मोरे, रामकृष्ण नायकोडे, एड. योगेश शिंपी, एड. अंकिता वेदपाठक, स्वाती सपकाळ, देवराव सुकळे, एलिझाबेथ असादे इत्यादी सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते आंदोलकांतर्फे निवडणूक नायब तहसीलदार श्री सादीक काझी यांनी निवेदन स्वीकारले आहे .

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

12 hours ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

1 day ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

1 day ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

4 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

6 days ago