या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, तालुका सरचिटणीस नितीन झिंजाडे, वाशिंबेचे माजी उपसरपंच अमोल पवार, तसेच परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
चौकट :
“आमचे नदीकाठचे क्षेत्र सीना नदीच्या पाण्याने वाहून गेले होते. पालकमंत्री गोरे साहेबांनी रात्री नऊ वाजता आमच्या शेताला भेट दिली होती व त्यांनी तुमचे नुकसान भरून देऊ असा शब्द दिला होता, गेल्या आठ दिवसांपासून बंधाऱ्याचे काम जलद गतीने चालू झाले आहे,आता आमच्या शेताच्या कडेला सुमारे १००० मीटर तटबंदी करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात पुराने शेतीचे नुकसान होणार नाही.”
सौ. मिना भारत माने
महिला शेतकरी, बिटरगाव.
“अगदी कमी वेळेत हे काम सुरू झाल्याने आम्ही पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब व गणेशभाऊ चिवटे यांचे शतशः आभारी आहोत. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व विश्वास निर्माण झाला आहे.”
युवराज गपाट, माजी सरपंच आळजापूर.
“या वर्षी नुकसान झाले असले तरी बंधारा दुरुस्त झाल्याने भविष्यासाठी शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य आणि मेहनतीची उमेद निर्माण झाली आहे.”
डॉ. अभिजित मुरूमकर.
“सीना नदीवरील बंधारे तुटल्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई येईल की अशी भीती होती, पण आता दुरुस्तीचे काम झाल्याने आम्ही समाधानी आहोत.”
हरिदास मोरे, शेतकरी तरटगाव.
संपूर्ण घटनेतून ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या तत्परतेचा आणि प्रशासनाशी प्रभावी समन्वय साधून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याच्या त्यांच्या कार्यशैलीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…