करमाळा (प्रतिनिधी) —मा. नगरसेविका सै.स्वातीताई महादेव फंड यांच्या पुढाकाराने व मा.आमदार संजय मामा शिंदे यांच्या सहकार्यातून कन्हैयालाल देवी यांच्या मार्गदर्शनाखाली वार्ड क्रमांक चारमध्ये विविध विकासकामांना गती मिळाली आहे.
कृष्णाजी नगर परिसरातील आण्णासाहेब हायस्कूल ते धनवे घरा पर्यंत रस्त्याचे काम विविध योजनेतून एक कोटी रुपयांचे काम सुरू झाले असून, गणेशनगर येथील आयसीआयसीआय बँक ते आमृळे दुकान तें फंड गल्लीपर्यंत एक कोटी पंचवीस लाख रुपयांच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामांमुळे परिसरातील नागरिकांच्या वाहतुकीच्या अडचणी दूर होणार आहेत.नगरसेविका सै. स्वातीताई महादेव फंड यांनी सांगितले की, “या विकासकामांसाठी मा. आमदार संजय मामा शिंदे यांच्या सहकार्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून घेतला आहे. तसेच वार्डातील पाणीपुरवठा समस्येचे निराकरण करण्यासाठीही प्रयत्न सुरू असून त्यासाठी आवश्यक प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले आहेत.”याशिवाय वार्डातील विविध मूलभूत सुविधा आणि सौंदर्यीकरणाच्या कामांना देखील गती देण्यात येत असून, नागरिकांच्या सुविधा आणि विकास हा आमचा प्रमुख उद्देश असल्याचे सौ.स्वाती महादेव फंड यांनी सांगितले आहे.
या कामांमुळे वार्ड क्रमांक चारमधील रहिवाशांना दिलासा मिळणार असून नागरिकांनी नगरसेविकांच्या या कार्याचे स्वागत केले आहे.
—
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…