Categories: करमाळा

करमाळा तालुक्याला वरदायिनी ठरणाऱ्या रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या मंजुरी संदर्भात मंत्री स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात येऊन प्रश्न मार्गी लावा- सतीश बापु नीळ

करमाळा (प्रतिनिधी) करमाळा तालुक्याला वरदायिनी ठरणाऱ्या रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या मंजुरी संदर्भात मंत्री स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात येऊन ही योजना तात्काळ मार्गी लावण्यात यावी अशी मागणी श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीश निळ यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करमाळा येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी आयोजित बैठकीत केली आहे
यावेळी महीला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल व जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी यासंदर्भात आम्ही प्रयत्नशील असून लवकरच अशी बैठक लावण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे .यावेळी बोलताना नीळ म्हणाले की आमच्या नेत्या रश्मी दिदी बागल यांनी ज्यावेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यावेळी रिटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याची एकमेव मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली होती याची आठवण करून देऊन या योजने संदर्भात मंत्री स्तरावर तातडीने बैठक आयोजित करून ही योजना मार्गे लावण्यात यावी अशी मागणी या बैठकीत केली आहे. यावेळी करमाळा तालुक्यातील विविध भागातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

4 hours ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

9 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

14 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

21 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

1 day ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

1 day ago