करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील पंजाब वस्ताद चौक ते पोथरे नाका या मुख्य मेनरोड वरील रस्त्याच्या डांबरीकरणास आमदार नारायण पाटील यांच्या आमदार फंडातून मंजुरी मिळाली आहे .
करमाळा शहरातील नागरिकांनी सदर मेनरोडच्या रस्त्याच्या डांबरीकरणाची माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्याकडे मागणी केली होती . त्यास अनुसरून माजी आमदार जगताप यांनी आमदार नारायण पाटील यांचे सहकार्याने सदरचे काम मार्गी लावले आहे . माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरण व कॉंक्रिटीकरणा सोबतच आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची अशी भुयारी गटार योजना व पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाची अशी अमृत -2 योजनेच्या मंजुरीच्या दृष्टीने देखील पाठपुरावा सुरू आहे .
प्रतिक्रीया
“माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे शब्दावर विश्वास ठेवून शहरवासीयांनी मला मतरूपी आशीर्वाद दिला. त्यास पात्र राहून माजी आमदार जगताप शहर विकासाच्या दृष्टीने सांगतील ती कामे करण्यास मी कटिबद्ध आहे. करमाळा शहरातील समस्या सोडवण्यासाठी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आग्रह आणि निधी मंजूर करून घेतला आहे . आमदार नारायण पाटील,करमाळा
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…