Categories: करमाळा

मा.आ.संजयमामा शिंदे यांचा कागदोपत्री विकास करमाळा शहरात दिसू लागला… विरोधकांनी फुकटचे श्रेय घेऊ नये – मविनय काका ननवरे यांचे आवाहन


करमाळा प्रतिनिधी
नगर विकास विभागाकडून तत्कालीन आमदार संजय मामा शिंदे यांनी करमाळा पालिका हद्दीतील महात्मा फुले चौक पुतळा ते जि.प.विश्रामगृह रस्ता मजबुतीकरण व स्ट्रीट लाईट बसविणे – १५० लाख,दत्त मंदिर(विकासनगर) ते नवीन न्यायालयीन इमारत रस्ता,मेनरोड व शहराअंतर्गत रस्त्यांवर स्ट्रीट लाईट बसविणे – ४०लाख,आय.सी.आय.सी.आय बँक ते जुनी लाकडी मिल फंड गल्ली (जुना बायपास) रस्ता मजबुतीकरण करणे -१५० लाख,पालिका हद्दीत अभ्यासिका बांधणे -५०लाख,गट नं.३७८ कत्तलखाना रोड (जुना नगर रोड) बेग फकीर दफनभूमी वॉल कंपाऊंड बांधणे -३० लाख,माजी सैनिक कारगिल भवन कंपाऊंड वॉल व सुशोभीकरण करणे -३०लाख,राज्यमार्ग ६८ ते अण्णासाहेब हायस्कूल रस्ता मजबुतीकरण करणे – १००लाख,दुधे डायगणोस्टिक सेंटर ते अण्णासाहेब हायस्कूल रस्ता मजबुतीकरण करणे -५०लाख असा निधी असा भरघोस निधी 2023 24 चे अर्थसंकल्पामध्ये मंजूर करून आणला होता सदर कामांच्या प्रशासकीय मान्यता होऊन त्या कामांना आता कार्यारंभ आदेश मिळाल्यामुळे ती कामे आता वेगात सुरू झाली आहेत.ही कामे आपणच सुरू केली अशा पद्धतीने काही मंडळी सध्या वावरत आहेत. संबंधित रस्त्याच्या कामावरती जाणे, स्वतःचे फोटो काढणे आणि ही कामे आपणच आणली असे सांगत मिरवणे हे चुकीचे असून विरोधकांनी त्याचे फुकटचे श्रेय घेऊ नये असे आवाहन विनयकाका ननवरे यांनी केले आहे.

चौकट –
माजी आमदार शिंदे यांच्या प्रयत्नशील विकास दृष्टीमुळे आत्तापर्यंत मतदारसंघातील सर्वच गावांतील विविध विकासकामे मार्गी लागली होती.या तुलनेत करमाळा शहरातील विकास कामांना मात्र अनंत अडचणी आल्या. कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करूनही ती कामे प्रत्यक्षात सुरू होऊ शकली नाहीत. दुर्दैवाने मामांचा पराभव झाला असला तरी त्यांनी मंजूर केलेली कामे मात्र आता वेगात सुरू आहेत याबद्दल शहरातील नागरिक समाधानी आहेत.
महादेव फंड
माजी नगरसेवक. करमाळा नगरपरिषद.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago