Categories: करमाळा

करमाळा शहरातील जनतेला बदला शिवाय पर्याय नाही -कुणाल( भैय्या ) पाटील

करमाळा, प्रतिनिधी – शहरातील स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, दिवाबत्ती आदी सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी शहरातील जनतेला परिवर्तनाशिवाय पर्याय नसल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते कुणाल पाटील यांनी व्यक्त केले आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत पाटील यांनी स्वबळावर लढण्याची तयारी केली असून करमाळा शहर विकास पॅनलच्या माध्यमातून शहरातील प्रलंबित असुविधांमध्ये सुधार घडवून आणण्यासाठी या पॅनलची निर्मिती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

याबाबत सविस्तर बोलताना पाटील यांनी सांगितले की, गेल्या कित्येक वर्षांपासून नगरपालिकेचा कारभार प्रस्थापित पाहत आहेत. भोवतालच्या इतर तालुक्यांच्या तुलनेत करमाळा शहराचा विकास असंबद्ध व्यवस्थेमुळे खुंटला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यासारख्या जीवनावश्यक सोयीसह शहरातील नागरिकांना अस्वच्छता, रस्त्यांची दुरावस्था, विस्कळीत दिवाबत्ती व्यवस्था आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नगरपालिकेचा कारभार त्याच त्याच प्रतिनिधींकडे जात असल्यामुळे नागरिकांच्या सोयीपेक्षा हे प्रतिनिधी स्वतःची सोय पाहण्यात निपुण झाले आहेत. मात्र घरपट्टी, पाणीपट्टी यांसह विविध कर देणाऱ्या नागरिकांची यामुळे कुचंबना होत आहे. या व्यवस्थेत बदल करण्यासाठीच करमाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदासह सर्व प्रभागातून युवा प्रतिनिधी पुढे करून नगरपालिकेचा कारभार पारदर्शक करण्यासाठी हा पॅनल निश्चितच प्रयत्नशील राहणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

लोकप्रतिनिधी, प्रशासन, ठेकेदार आणि कर्मचारी यांची साखळी तोडून शहराला सुरळीत पाणीपुरवठा, रस्ते आणि गटारींची उत्कृष्ट कामे, नामांकित कंपनीचे पथदिवे यांसह नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात होणारी विविध विकासकामे निरंतर टिकण्यासाठी करमाळा शहर विकास पॅनलचे प्रतिनिधी विशेष लक्ष देणार आहेत. विविध शासकीय योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या पॅनलशिवाय दुसरा पर्यायच नसल्याने सामान्य नागरिकांचाही कौल या नव्या पर्यायाकडे असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

शहरातील प्रस्थापित गट केवळ सत्ता काबीज करण्याच्या दृष्टीने एकत्र येण्यासाठी बैठका घेत असताना कुणाल पाटील यांनी मात्र एकला चलो रे ही भूमिका घेत शहरातील नागरिकांच्या भेटीगाठी सुरू केल्या असून या भेटी-गाठींच्या माध्यमातून त्यांनी नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांसाठीचे युवा आणि सुयोग्य उमेदवार निवडले असल्याचेही पाटील यांनी शेवटी सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago