जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पूरग्रस्त विद्यार्थी यांना शालेय साहित्य देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन सामाजिक संस्था, उद्दोजक तसेच वेगवेगळ्या कार्यालय यांना केले होते त्याच आवाहनाला प्रतिसाद देत उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्वयंसहायता समूह मधील सदस्य, अभियानातील कर्मचारी यांनी स्वखुशीने निधी जमा करून करमाळा तालुक्यातील 7 गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी यांना 700 शालेय कीटचे वाटप केले. करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त असलेले बाळेवाडी व पोथरे या दोन्ही गावातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, केंद्रप्रमुख निशांत खारगे, तालुका अभियान व्यवस्थापक सुषमा बिचुकले, अवधूत देशमुख,गणेश पाटील, आण्णा आवताडे, उमेश डांगे, तालुका व्यवस्थापक योगेश जगताप, दिगंबर साळुंखे, चंद्रकांत माने इ.उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप म्हणाले की, सदर शैक्षणिक साहित्य हे चांगल्या दर्जाचे असून त्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून अधिकारी होवून आपल्या आई वडील व शाळेचे नाव वेगळ्या उंचीवर घेवुन जावे.
यावेळी बोलताना उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे म्हणाले की,शालेय विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवावे , पूरग्रस्त गावातील जिल्हा परिषद शाळेतील एकही विद्यार्थी शालेय साहित्य विना वंचित राहू नये, त्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केलेल्या आवाहनाला उमेद अभियानाचे सर्व कर्मचारी व स्वयंसहायता समूहातील महिला यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला . उमेद अभियानाच्या वतीने जवळपास 4.50 लाख रुपये किंमतीचे चांगल्या दर्जाचे शालेय साहित्य 700 विद्यार्थी यांना वाटप करून सामजिक कार्यात सहभागी झाल्याचा आनंद व्यक्त केला. यावेळी करमाळा तालुक्यातील उमेद अभियानातील तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक, समूहातील महिला उपस्थित होत्या.
*शालेय विद्यार्थी यांना सदर कीट मध्ये
1 बॅग,12 वह्या, पेन, कंपास, चित्रकला वही, पाटी असलेले साहित्य देण्यात आले.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…