Categories: करमाळा

करमाळा नगरपरिषद निवडणुकीकरता इच्छुक उमेदवारांनी भाजप संपर्क कार्यालयात संपर्क साधावा- सौ.रश्मी दिदी बागल महिला प्रदेश उपाध्यक्षा भाजप

करमाळा प्रतिनिधी- करमाळा नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणुकी करिता भारतीय जनता पक्षा मार्फत जे उमेदवार इच्छुक आहेत अशा इच्छुक उमेदवारांनी विद्यानगर येथील भाजपा कार्यालयात संपर्क साधून आपण इच्छुक असल्याबाबतचे विहित नमुन्यातील फॉर्म उद्या आणि परवा म्हणजे दिनांक सहा व सात नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत सादर करावेत असे आवाहन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व साखर संघाच्या संचालिका रश्मी दिदी बागल यांनी आज येथे केले आहे याबाबत अधिक बोलताना रश्मीदीदी बागल म्हणाल्या की करमाळा नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाली असून भारतीय जनता पक्ष संपूर्ण ताकतीनिशी ही निवडणूक लढवणार असून जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी विद्यानगर येथील भाजपा कार्यालयाशी संपर्क करून आपण आपले इच्छुक असल्याबाबतचे विहित नमुन्यातील फॉर्म दिनांक सहा व सात नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत सादर करावे इच्छुक उमेदवारांच्या संदर्भातील निर्णय पक्षपातळीवर वरिष्ठ घेतील करमाळा शहर हे परिवर्तनासाठी सज्ज असून या निवडणुकीमध्ये निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळेल असा विश्वास यावेळी रश्मी दीदी बागल यांनी व्यक्त केला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

6 hours ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

10 hours ago

आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ झरे येथे ५२५ गणेशमूर्तींचे मोफत वाटप* *सुनील बळवंत झरे यांच्या उपक्रमाचे सहावे वर्ष गणेशमूर्ती घेण्यासाठी ग्रामस्थांची उत्स्फूर्त गर्दी

करमाळा प्रतिनिधी आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ धार्मिक व सामाजिक बांधिलकी जपत झरे (ता. करमाळा) येथील सुनील बळवंत…

12 hours ago

संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांचा दुहेरी गौरव जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारांनी सन्मान

करमाळा  प्रतिनिधी श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा (ता. करमाळा)चे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय…

13 hours ago

आपलं गाव- आपला विकास, गाव भेट दौऱ्याच्या माध्यमातुन करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने यांच्या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक

करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद/ पंचायत समितीच्या निवडणुका मध्यंतरी पार पडल्या असुन, अनेक नवीन होतकरू नेतृत्वांना…

13 hours ago