माजी आमदार जयवंतराव जगताप हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये असून शिंदे सेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले असून त्यानुसार उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून नगराध्यक्ष पदासाठी जगताप गटाकडून माजी आमदार जयवंतराव यांच्या पत्नी सौ नंदिनी जगताप , जगताप गटाचे श्रेणिक शेठ खाटेर यांच्या पत्नी माजी नगरसेविका संगीता खाटेर यांच्या नावाची चर्चा आहे तर सावंत गटाकडून सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडी यांच्या माध्यमातून माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या पत्नी सौ मोहिनी सावंत नगराध्यक्ष पदासाठी एकमेव उमेदवार आहेत त्यामुळे करमाळा नगरपालिकेचे निवडणूक मोठी चुरशीची होणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. पारंपारिक जगताप गट यांना शह देण्यासाठी बागल गटांने महायुतीच्या माध्यमातून भाजप देवी गट संजयमामा शिंदे गट भाजप कार्यकर्ते यांची मोळी बांधली आहे . बागल गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांची भूमिका या निवडणुकीत निर्णयाक ठरणार आहे. तर सावंत गटानै ही स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे पक्षीय पातळीवर निवडणूक लढवण्या साठी कार्यकर्त्याच्या सोयीनुसार भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या चिन्हाचा उपयोग या निवडणुकीत करण्याची शक्यता आहे. एकंदर ही निवडणूक तिरंगी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगरसेवक पदासाठी अनेक उमेदवार बाशिंग बांधून तयार आहेत परंतु साम-दाम दंड भेद यामध्ये सरस ठरणाऱ्या निवडणून येणारी पात्रता असलेल्या उमेदवारालाच उमेदवारी देण्यासाठी गटाचा प्रयत्न असणार आहे. करमाळा शहरातील रस्ते पाणी याबरोबर स्वच्छता छत्रपती शिवाजी महाराजाचा अश्वारूढ पुतळा टाऊन हॉल शॉपिंग कॉम्प्लेक्स महावीर उद्यान नगरपालिकेची इमारत हे मुद्दे महत्त्वाचे ठरणार असून माजी नगरसेवकालाही केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा लागणार आहे. येणारे निवडणुक खऱ्या अर्थाने नेत्यांच्या अस्तित्वाची तर गटातटाची प्रतिनिधित्व करणाऱ्या भावी नगर सेवकांच्या सत्व परीक्षेची ठरणार आहे. या निवडणुकीमध्ये जनता जनार्दनाचा विश्वास संपादन करून नक्की कोण बाजी मारतो याचा निकाल 3 डिसेंबरला आपणास कळणारच आहे परंतु तिरंगी लढत अटळ असून जनतेची मते आपल्या पारड्यात घेऊन जगतापगट शिंदे सेनेच्या माध्यमातून नगरपालिकेमध्ये सत्ता राखण्यात यशस्वी होतो सर्व विरोधकांची बांधून बागल गट या निवडणुकीत फिफ्टी फिफ्टी च्या फॉर्मुल्याने यश मिळवतो हे आपणास बघायला मिळणार आहे. दोन्ही गटाला आव्हान देणारा सावंत गट शहर विकास आघाडीच्या माध्यमातून नागरिकांच्या पसंतीला उतरून सत्ता मिळवतो हे येणारा निकालच आपणाला सांगणार आहे. एकंदर ही निवडणूक चुरशीची होणार असून सत्ताधारी विरोधक एकत्र येऊन कारभार केल्यामुळे जनता ही आपला विचार करून आपल्या आवडत्या काम केलेल्या उमेदवाराची निवड करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक गटातटापेक्षा व्यक्ति केंद्रित झालेली दिसून येत आहे. तिरंगी लढतीमध्ये जो गट बाजी मारेल तोच या करमाळा शहराचा सत्ताधारी मालक होणार आहे.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…