Categories: करमाळा

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना एम एस सी बँकेकडे असलेले‌ तीन कोटी 32 लाख मिळवून दिल्याबद्दल कामगारांच्या वतीने संचालक ॲड. राहुल सावंत व ज्येष्ठ संचालक डॉ.हरिदास केवारे यांचा सत्कार

करमाळा प्रतिनिधी : – श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे साखर विक्रीतील एम एस सी बँकेकडे असलेले‌ कामगारांचे हक्काचे‌ तीन कोटी ‌ 32 लाख रुपये ‌ कामगारांना न्याय मिळवून दिल्याबद्दल ‌श्री आदिनाथ कारखान्याचे संचालक ॲड. राहुल सावंत व डॉ हरिदास केवारे यांचा कामगारांच्या वतीने आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
चेअरमन व आमदार श्री नारायण आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक डॉ हरिदास केवारे व ॲड राहुल सावंत यांच्या प्रयत्नातून कामगारांना ३ कोटी ३२ लाख ८२ हजार ११९ रुपये व त्यावरील व्याज मिळून दिल्याबद्दल कामगारांनी संचालक ॲड राहुल सावंत व डॉ. हरिदास केवारे यांचा सत्कार केला. यावेळी श्री आदिनाथ महाराज मंदिर येथे भंडारा ठेवण्यात आला होता.
आ. रणजितसिंह ( दादा ) मोहिते पाटील, खा. धैर्यशील ( भैय्या ) मोहिते पाटील, कारखान्यांचे चेअरमन व आमदार नारायण ( आबा ) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक डॉ हरिदास केवारे व ॲड. राहुल सावंत यांच्या प्रयत्नातून यश आले. सहा वर्षांपासून बॅकेत पेडींग असलेली रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.
श्री आदिनाथ कारखान्याने MSC बँकेकडे साखर विक्रीचे असलेल्या रक्कम रु. ३ कोटी ३२ लाख ८२ हजार ११९ रूपये (अधिक त्या वरील व्याज) पैकी पहिल्या टप्प्यात रक्कम रूपये २५१४७८०९ ( अधिक त्या वरील व्याज ) इतकी रक्कम श्री आदिनाथ सह. साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये अदा करावेत (देण्यात यावेत) या करिता अर्ज केलेला होता. सोलापूर येथील मे.कोर्ट श्री. कुंभार साहेब यांच्याकडे कारखान्याने दाखल केलेला अर्ज मंजूर केलेला आहे आणि रक्कम रु. ३ कोटी ३२ लाख ८२ हजार ११९ रूपये (अधिक त्या वरील व्याज) पैकी पहिल्या टप्प्यात रक्कम रूपये २५१४७८०९ ( अधिक त्या वरील व्याज) इतकी रक्कम कारखान्याच्या कर्मचाऱ्यां मध्ये देण्याबाबत मे.कोर्टाने आदेश केलेला आहे अशी माहिती संचालक ॲड. राहुल सावंत यांनी दिली आहे.
त्या वेळेस च्या आपसातील मतभेदांमुळे ही रक्कम बँकेत सहा वर्षांपासून पेडींग राहिली.
जवळपास तीन महिन्यांपासून ॲड.राहुल सावंत व डॉ हरिदास केवारे यांनी चेअरमन व संचालक मंडळ, कर्मचाऱ्यांना आणि प्रशासकीय अधिकारी विश्वासात घेऊन सोलापूर येथे मे. कोर्टात स्वतः हजर राहून प्रयत्न करत होते. त्या अनुषंगाने कायम कर्मचारी व हंगामी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांची यादी विभागानुसार प्रत्येक कर्मचाऱ्यांचे नाव, प्रत्येकाचे बँक खाते नंबर व आयएफसी कोड सहित कारखान्यांनी ही यादी कोर्टात दाखल केली आणि त्या प्रमाणे मे कोर्टाने रक्कम कर्मचाऱ्यांना अदा करण्यात यावे असा आदेश दिला. त्या नुसार पहिल्या टप्प्यात दि. ३०/१०/२०५ रोजी ही रक्कम कामगाराच्या बँक खात्यात जमा झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात काही कामगार यांची रक्कम त्यांच्या बॅक खाते नंबर वर जमा होईल तसेच उर्वरित ज्या कामगारांना रक्कम मिळाली नाही त्या कामगारांनी लवकरात लवकर मे कोर्टात अर्ज दाखल करावा म्हणजे त्यांची रक्कम बँकेत खाते नंबर वर जमा करता येईल . काही अडचण आली तर माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन संचालक ॲड राहुल सावंत यांनी केले.
या वेळी कार्यकारी संचालक अरूण बागनवर, ओ एस मधुकर कदम, चिफ इंजिनिअर जाधव साहेब, चिफ केमिस्ट कुलकर्णी साहेब, डिप्युटी चिफ इंजिनिअर दिपक देशमुख, डिप्युटी चिफ केमिस्ट मोहीते साहेब, आर एम जाधव आणि कामगार ऊत्तरेश्वर चव्हाण, बाळासाहेब महाडीक, बाबा शिंदे, महेश मोरे, कुंडलिक शिंदे, राहुल झिंजाडे, दादासाहेब रासकर, बाबासाहेब केकान काकासाहेब भानवसे,दिलिप झिंजाडे, वजीर भै, वनराज बाळशंकर, हनुमंत पाटुळे, युवराज टकले, देविदास कुंभार, बाबा तोरणे, गणेश कराड तसेच कामगार उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

3 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

9 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

19 hours ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

23 hours ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बारावीची परीक्षा उत्साहात; ११०४ विद्यार्थी केंद्रावर परीक्षार्थी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…

1 day ago

करमाळा शहर हद्दवाढीची भाजप नगरसेविका सौ. स्वाती महादेव फंड यांची मागणी; व्होटकर पुल–श्रीदेवीचामाळ रस्ता नगरपरिषदेकडे देण्याचा प्रस्ताव*

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहराची हद्दवाढ करून शहरालगत विकसित झालेल्या ग्रामीण भागाचा नगरपरिषदेच्या हद्दीत समावेश…

2 days ago