Categories: करमाळा

डॉ तेजस्वी गपाट यांचे सनदी लेखापाल परीक्षेत यश

प्रतिनिधी | बार्शी

येथील डॉ तेजस्वी विजय गपाट या सनदी लेखापाल (चार्टर्ड अकौटंट) ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.तेजस्वी यांनी अगोदर मुंबई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डेंटल सर्जरीतील पदवी घेतली होती. सनदी लेखापाल विजय गपाट यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांनी सनदी लेखापाल होण्याची जिद्द बाळगत तयारी केली. कुटुंबियांची साथ व अथक परिश्रमातून त्यांनी या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले. विजय गपाट यांचे बंधू गणेश गपाट हेही सनदी लेखापाल आहेत. एका सामान्य शेतकरी कुटुंबातुन प्रगती साधलेल्या नवनाथ गपाट यांच्या कुटुंबातील तिघे सनदी लेखापाल झाले आहेत. डॉ तेजस्वी गपाट या बार्शीतील डॉ गणेशकुमार सातपुते यांच्या भगिनी आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago