करमाळा नगरपरिषद सदस्य पात्रता म्हणून उम्मेदवाराचे वय २१ वर्षे पूर्ण असून तो करमाळा शहरातील रहिवासी असावा व त्याचे मतदार यादीमध्ये नाव असावे.सुचक संख्या पाच असून पक्षाने उमेदवारी दिल्यास एक सुचक असणे गरजेचे आहे.
उमेदवारीसाठी – १अनामत रक्कम सर्वसाधारण उमेदवार रु.१०००/-राखीव उमेदवार:- रु.५००/- (जातीचा दाखला असणे आवश्यक) महिला उमेदवार रु.५००/- नामनिर्देशन कालावधी दि.१०/११/२०२५ ते दि.१७/११/२०२५ रोजी सकाळी ११.०० ते दु.३.०० वाजेपर्यंत (शासकीय सुट्टी वगळता) असुन नामनिर्देशन पत्र श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर, किल्ला विभाग, करमाळा येथे स्वीकारले जाणार आहे .
छाननी दि.१८/११/२०२५ (श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर, किल्ला विभाग, करमाळा येथे होणार आहे
नामनिर्देशन मागे घेण्याची :-अंतिम दिनांक अपील नसेल तेथे दि.२१/११/२०२५ पर्यंत. अपील असेल तेथे दि.२५/११/२०२५ पर्यंत चिन्ह वाटप दिनांक दि.२६/११/२०२५मतदान दि.०२/१२/२०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० वा. होणार आहे मतमोजणी दिनांक दि.०३/१२/२०२५ रोजी सकाळी १०.०० वा. पासून मतमोजणी पार पडणार असून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सांस्कृतिक सभागृह. येथे होणार आहे.
या निवडणुकीसाठी नागरिकांनी दिलेल्या आदर्श आचारसंहितेचे पालन करावे तसेच डिजिटल मीडिया व प्रिंट माध्यमातील पत्रकारांनी दिलेल्या आचारसंहितेनुसार वृत्तांकन करावे असे आवाहन करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी केले या पत्रकार परिषदेला कार्यालय अधीक्षक स्वप्नील बाळेकर,आकाश वाघमारे,नगर अभियंता,शशांक भोसले सहा.नगर रचनाकार हिंदुराव जगताप,सहा.लेखापालसोमनाथ सरवदे,अंत.लेखापरीक्षक विपूल पुजारी,स्वच्छता निरीक्षक लिपीक पीयूष शिंपी कर्मचारी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…
करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…
करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…