करमाळा शिवसेनेचा उपक्रम डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या वतीने शिवसेनेचे माजी आमदार. नारायण ( आबा ) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने मास्क आणि आर्सेनिक अल्बम गोळ्याचे वाटप

करमाळा( प्रतिनिधी )
करमाळा तालुक्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्यावतीने करमाळा शहरात आज 2000 मास्क 4000 अर्सेनिक गोळ्यांच्या डब्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे शहर प्रमुख प्रवीण कटारिया युवा सेनेचे तालुका अध्यक्ष सागर गायकवाड उपशहर प्रमुख पांडुरंग जाधव प्रमुख संजय शीलवंत पत्रकार नागेश चेंडगे कुंभेज शिवसेना शाखाप्रमुख मारुती भोसले उपशहर प्रमुख संजय भालेराव पंकज परदेशी शाखाप्रमुख सुरज कांबळे दशरथ कांबळे अण्णा यादव दीपक भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की, खासदार डॉक्टर श्रीकांत फाउंडेशनच्यावतीने करमाळा तालुक्यात आत्तापर्यंत 2000 मास्क चे वाटप करण्यात आले. सोबतच आर्सेनिक गोळ्या घरोघरी देण्यात आलेल्या आहेत. आज शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करमाळा शहरात आलेल्या ग्रामीण भागातील सर्व बाजार करून मास्क वाटण्यात आले आहेत.
लवकरच करमाळा तालुक्यासाठी शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन यांच्या वतीने एक अद्ययावत रुग्णवाहिका करमाळा तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती शेवटी उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, शहरप्रमुख प्रवीण कटारिया यांनी दिली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

13 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

14 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

19 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

1 day ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

2 days ago