Categories: करमाळा

भारतीय जनता पार्टी करमाळा नगरपालिका निवडणूक नगराध्यक्ष पदाची निवडणुक भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवणार जिंकणार-आमदार सचिन कल्याणशेट्टी*

 करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी करमाळा नगरपालिका नगराध्यक्षपदाची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवणार जिंकणार असल्याचे मत निवडणूक प्रमुख आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ.रश्मी दिदी बागल यांच्या विद्यानगर करमाळा येथील संपर्क कार्यालयात आयोजित इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की करमाळा नगरपालिकेची ही निवडणूक ‌म्हणजे आपल्या पक्षासाठी प्रतिष्ठेची मोठी बाब असून भारतीय जनता पार्टी मोठ्या ताकतीने निवडणूक लढवणार जिंकणार असल्याचे त्यांनी सांगितले . नगरपालिका निवडणूक संदर्भात महायुती मधील इतर घटक पक्षाची आमची बोलणी चालू असून वरिष्ठ पातळीवर तो निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष सौ रश्मी दिदी बागल, भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे, भाजप नेते प्रा. रामदास झोळ सर, सूर्यकांत पाटील, कन्हैयालाल देवी दिपक चव्हाण , सचिन पिसाळ,काकासाहेब सरडे, जगदीश आगरवाल ,अमोल पवार, किरण बोकन, सतीश बापू नीळ सुहास घोलप, रामभाऊ ढाणे, शशिकांत पवार लक्ष्मण केकान जितेश कटारिया उपस्थित होते. करमाळा तालुक्याचे राजकारण जरी गटातटाचे असले तरी आता ही निवडणूक गटातटावर न लढवता भाजप पक्षाच्यावतीने लढवली जाणार असल्याने कार्यकर्त्यांनी व भाजपच्या सर्व गटातटाच्या नेतेमंडळींनी आपसातील मतभेद हेवेदावे विसरून या निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी कामाला लागावे. नगरपालिकेची ही निवडणूक आपणाला कसल्याही परिस्थितीत जिंकायची असून पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपची ताकद दाखवून देण्याची हीच खरी वेळ आहे त्यामुळे आपण भाजप म्हणून सर्वांनी एकत्रितपणे काम करून यशाचे भागीदार व्हावे असे आवाहन त्यांनी केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच आपल्याला आपल्या कामाची पोचपावती देणार असून याचा मला चांगला अनुभव मला आला आहे.जे कोणी पक्षाच्या विरोधात काम करतील त्यांच्यावर वरिष्ठ पातळीवर पक्ष कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष व नगरसेवक या निवडीचा अधिकार सर्व वरिष्ठ पक्षपातळीवर केलेल्या कामाच्या अनुषंगाने पक्षातील सर्व नेतेमंडळीच्या शिफारशीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या सूचनेनुसार घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले भाजपच्या वतीने करमाळा नगरपालिका निवडणूक २०२५ लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण निवडणूक प्रमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी नगरसेवक पदासाठी उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. यामध्ये सौ.सविता जयकुमार कांबळे,सौ.उषा रामदास कांबळे, रणजीत आजिनाथ कांबळे,सौ. विजया किसन जानराव सौ. पुष्पा बाळासाहेब कांबळे,सौ. धनश्री जयंत दळवी, किरण अरुण बोकन, सौ. लता विजय घोलप, गोपाल पांडुरंग वाघमारे, सौरभ सतीश शिंगाडे, सौ. सपना संजय घोरपडे, संताजी संजय घोरपडे, सौ.भाग्यश्री राजेंद्र मांगले शिंगाडे, सौ.मंगल बाळासाहेब कुलकर्णी, गणेश बाबासाहेब माने, चंद्रकांत बलभीम शिंदे, नितीन अविनाश कांबळे, बाळासाहेब सिताराम कुंभार, सौ. राजश्री दत्तात्रय माने, सुहास निवृत्ती घोलप, सचिन रामचंद्र घोलप, संजय नारायण घोरपडे,सौ. ज्योती सचिन घोलप, विजय बाळासाहेब घोलप, निलेश श्रीनिवास कांबळे, शौकत हुसेन नालबंद, दीपक अरुण चव्हाण, विनोद विष्णू महानवर, नितीन दत्तात्रय चोपडे, महेश नारायण दिवाण, सौ.सिमा गोरख कांबळे, राहुल नामदेवराव जगताप, ऋषिकेश सतीश सिगची ,अतुल हरिभाऊ फंड, राजू भिकाजी आव्हाड, ऋतुजा महेश आल्हाट, रितेश रणजीत कटारीया सिकंदर मच्छिंद्र जाधव , सुनिता बाळू ढाणे ,रुबीना मुकबुल पठाण,प्रवीण प्रदीप जाधव, जगदीश ललित आगरवाल, महादेव आजिनाथ फंड, सौ स्वाती महादेव फंड, सौ. मनिषा सिद्धार्थ कांबळे, सौ. उषा रामदास कांबळे, डॉ. मनिषा हर्षवर्धन माळवदकर, श्रीमती सत्यभामा अर्जुन बनसोडे, सौ स्वाती रामकृष्ण माने संग्राम रामकृष्ण माने, सचिन प्रदीप चव्हाण, सौ संगीता देविदास नष्टे, श्रुती आदेश कांबळे श्रीमती निर्मला बाबुराव गायकवाड या उमेदवारांनी प्रभाग निहाय मुलाखती दिल्या आहेत. मुलाखत दिलेल्या इच्छुक उमेदवारातूनच निवड केली जाणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण चौघां जणांनी आपल्या मुलाखती दिल्या असून यामध्ये सौ. सुनिता कन्हैयालाल देवी, सौ. सपना संजय घोरपडे डॉ. वैशाली अविनाश घोलप, सौ अरुंधती राहुल जगताप यांनी मुलाखती दिल्या असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वांच्या सहमतीने वरिष्ठांच्या ‌ व स्थानिक नेत्यांच्या ‌ मतानुसार अंतिम निवड करून उमेदवारी जाहीर केली ‌ जाणार असल्याचे निवडणूक प्रमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सांगितले .

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात श्री संत नामदेव शिंपी महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहास भक्तिमय प्रारंभ११ ऑगस्ट रोजी संजीवन समाधी सोहळा महाप्रसाद,

करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…

1 hour ago

स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी स्व. रुक्मिणी विठ्ठल आवताडे यांच्या २७ व्या पुण्यस्मरणानिमित विशाल महाराज खोले यांचा ‘आई-वडील हेच खरे दैवत’चा हृदयस्पर्शी संदेश

करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…

3 hours ago

शाहुनगर पाणीप्रश्नाला मोठा दिलासा; नवीन चार इंची पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ उत्साहात नगरपरिषदेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…

4 hours ago

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन संवर्धनासाठी भाविकांचा वाढता प्रतिसाद; विकास चौकटे यांची ₹३,००१ देणगी

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…

1 day ago

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरने चार महिन्यापासून मंजूर झाली नाहीत तत्काळ मंजूर करा अन्यथा आंदोलन करू – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…

1 day ago

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

2 days ago