Categories: करमाळा

कर्जत जामखेडच्या राजकारणात बुधवारी मोठा राजकीय भूकंप आरडी ग्रुपचे सर्वेसर्वा राजेंद्र पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश

कर्जत प्रतिनिधी कर्जत जामखेडच्या राजकारणात बुधवारी मोठा राजकीय भूकंप झाला. सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त तथा आर डी ग्रुपचे सर्वेसर्वा राजेंद्र पवारांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केली. त्यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडला. सेवानिवृत्तीनंतर राजेंद्र पवार पाटील हे राजकारणात सक्रिय होणार की इतर मार्ग निवडणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी राजकीय मैदानात शड्डू ठोकण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी भाजपाची निवड केली आहे. विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील त्यांनी बुधवारी भाजपात जाहीर प्रवेश करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली
: सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त राजेंद्र पवार यांचा कर्जत-जामखेड मतदारसंघात मोठा मित्र परिवार आणि नातेवाईकांचा मोठा गोतवळा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते आर डी ग्रुपच्या माध्यमांतून समाजकारणात सक्रीय आहेत. आजवरच्या प्रत्येक निवडणुकीत आर डी ग्रुपने नेहमीच निर्णायक भूमिका बजावलेली आहे. आर डी ग्रुपचा आशिर्वाद ज्या उमेदवाराला तो विजयी होतो, अशी आजवरची स्थिती राहिलेली आहे.
राजेंद्र पवार हे प्रशासकीय सेवेत असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष निवडणूकीच्या मैदानात उतरता येत नव्हते, परंतू त्यांच्या पत्नी राजकीय वर्तुळात सक्रीय असायच्या. त्यांनी २०१७ ते २०२२ या काळात आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक म्हणून काम पाहिले. जिजामाता पतसंस्थेच्या त्या विद्यमान चेअरमन आहेत. तर राजेंद्र पवार हे मुंजोबा सोसायटीचे मुख्य प्रवर्तक तसेच जिजामाता पतसंस्थेचे संस्थापक आहेत.
आर डी ग्रुपच्या माध्यमातून माठा माट बांधून आपली राजकीय ताकद वेळोवेळी दाखवून दिली आहे. राजेंद्र पवार यांच्या भाजपा प्रवेशामुळे कर्जत-जामखेडमधील राजकीय समीकरणे बदलली आहे. पवार यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजप पर्यायाने प्रा राम शिंदे यांची राजकीय ताकद वाढली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपला आर डी ग्रुपचा मोठा फायदा होणार आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago