Categories: करमाळा

करमाळा नगरपालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूकीसाठी 14 नोव्हेंबर पाचव्या दिवशी चार उमेदवारी अर्ज दाखल

करमाळ प्रतिनिधी : करमाळा नगरपालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबरला पाचव्या दिवशी उमेदवारांनी अखेर चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहे . करमाळा नगरपालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक नगराध्यक्षपदासाठी प्रियंका सिद्धांत वाघमारे यांचा पहिला अर्ज दाखल केला आहे .नगरसेवक पदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारंगे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आले आहे. नगरसेवक पदासाठी जगताप गटाचे समर्थक माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी प्रभाग 6अ , सिद्धांत वाघमारे प्रभाग 7 व विजया जानराव यांनी प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज पाचवा दिवस होता. 17 तारखेपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट) यांचे अजूनही उमेदवार निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे कोणाचे अर्ज येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. महायुतीकडून भाजपचे कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी बागल गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे यांची पत्नी सौ जयश्री विलासराव घुमरे यांची नावे चर्चेत असून अंतिम निर्णय भाजपातील वरिष्ठ मंडळी जाहीर करणार आहेत तर शिवसेनेकडून (शिंदे गट) जगताप गटाच्या सौ. नंदनीदेवी जयवंतराव जगताप यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
प्रियंका वाघमारे यांचा अर्ज दाखल करतेवेळी सामाजिक कार्यकर्ते सुहास ओहोळ हे उपस्थित होते. विजया जानराव यांनी प्रभाग क्रमांक 10 मधून नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारगे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन तपसे यांच्याकडे यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

नगराध्यक्ष – एकूण 1
प्रियांका सिद्धांत वाघमारे – अपक्ष
नगरसेवक – एकूण 3
10 ब जानराव विजया किसन अपक्ष
7 ब सिद्धांत सदाशिव वाघमारे अपक्ष
6 अ प्रशांत मोहन ढाळे अपक्ष

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

11 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

13 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

2 days ago