Categories: करमाळा

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल, स्वामी चिंचोली येथे बालदिन सप्ताह उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल, स्वामी चिंचोली येथे बालदिन सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी विविध गुणदर्शनात्मक व क्रियाशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.                         पहिला दिवस (१० नोव्हेंबर)एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने दत्तकला संकुलात ५७० झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. याच दिवशी Treasure Hunt स्पर्धेत वि‌द्यार्थ्यांनी चमकदार सहभाग नोंदवला.

दुसरा दिवस (११ नोव्हेंबर)

“Science in Day to Day Life” या विषयावर उपक्रम घेण्यात आले. या उपक्रमामध्ये शिक्षकांनी स्वतः विविध पात्रातून दैनंदिन जीवनातील विज्ञानाच्या उपयोगाची उदाहरणे वि‌द्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिली व अनुभवली.

तिसरा दिवस (१२ नोव्हेंबर)

“Fun with Math’s” या उपक्रमांतर्गत गणित विषयावरील खेळ, कोडी व रोचक क्रियाकलापांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गणिताचा भीतीदायक विषय किती मजेशीर असू शकतो हे अनुभवले.

चौथा दिवस (१३ नोव्हेंबर)

या दिवशी विद्यार्थ्यांनी Story Dramatization, Freedom Struggle Skit अशा उत्कृष्ट नाट्यरूप सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. इंग्रजी विभागाने Drama सादर केला तर मराठी व हिंदी विभागांनी कथा, कविता व नाटिका सादर करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मंच दिला. EVS विभागाने ‘दांडीमात्रा’, ‘चरखा’ इत्यादींच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्याचे अतिशय प्रभावी सादरीकरण केले.

१४ नोव्हेंबर रोजी दत्तकला इंटरनॅशनल स्कूलमध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत Fun Fair चे आकर्षक आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध खेळ, स्टॉल्स, खाऊ-पदार्थ, कला-प्रदर्शन, लहान गेम्स, प्रकल्प सादरीकरणे यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला.

Fun Fair मधील रंगीबेरंगी स्टॉल्स, विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि आनंदी वातावरणामुळे संपूर्ण परिसर बालदिनाच्या उत्साहाने भारून गेला. पालकांनीही कार्यक्रमाला मोठी उपस्थिती लावून मुलांचे कौतुक केले.

दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोल सर यांनी बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरित केले. आपल्या अनुभवसंपन्न शब्दांतून त्यांनी विद्यार्थी जीवनातील शिस्त, जिज्ञासा, ध्येयवेड आणि मूल्यांचे महत्त्व सांगितले. झोळ सरांच्या आत्मीयतेने भरलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन ऊर्जा, आत्मविश्वास आणि मोठी स्वप्ने पूर्ण करण्याची उर्मी निर्माण झाली. शाळेच्या प्राचार्या व शिक्षकवर्गाने मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करावे असे सांगितले व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सचिव सौ माया झोळ तसेच संस्थेचे व्यावस्थापकिय अधिकारी डॉ. विशाल बाबर उप्ठीत होते.उपक्रमांची रंगत वाढवण्यासाठी विविध शिक्षकांनी समन्वयक म्हणून परिश्रम घेतले. विशेषतः संगीता खाडे, ज्योती झोरे, रुपाली दवणे, गौरी पवार, वर्षा झोळ आदी शिक्षकांसह सर्व विभागातील शिक्षकांचा सहभाग उल्लेखनीय होता. प्राचार्या सौ नंदा ताटे मॅडम (CBSE) व प्राचार्या सौ. सिंधू यादव मॅडम (SSC) यांनी कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शन केले व विदयार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.वि‌द्यार्थ्यांनी आनंदाने व उत्साहाने आठवडाभर विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेत बालदिन सप्ताह संस्मरणीय केला.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

10 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

13 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

2 days ago