Categories: करमाळा

करमाळयात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत विचारात घेऊन निर्णय न घेतल्याने शिवसेनेचे दिग्विजय बागल गट  समर्थकाचे 55 शाखाप्रमुखाचे सामुहिक राजीनामे

करमाळा प्रतिनिधी करमाळयात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विचारात घेऊन निर्णय न घेतल्याने युवा नेते दिग्विजय बागल गट समर्थकाचे 55 शाखाप्रमुखाचे राजीनामे दिले आहेत.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे, मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून, एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढलं आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, निवडणूक आयोगाकडून राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकारणात घडामोडींना वेग आला आहे, राज्यात काही ठिकाणी या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार आहेत, काही ठिकाणी स्थानिक समिकरण लक्षात घेऊन युती आघाडीचा निर्णय घेतला जाणार आहे, तर काही ठिकाणी पक्षांनी स्वबळावर ही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र आता निवडणूक लागताच पदाधिकारी आणि नेत्यांच्या नाराजीचा फटका देखील पक्षांना बसत असल्याचं दिसून येत आहे, मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे.करमाळयाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची शिवसेना शिंदे गटाकडून नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र त्यांची नियुक्ती होताच शिवसेना शिंदे गटात फूट पडल्याचं पहायला मिळत आहे. बागल गटाकडून सामूहिक राजीनामा देण्यात आला आहे. जयवंत जगताप यांची नगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती होताच शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत सामूहिक राजीनामा दिला आहे. जगताप यांच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या दिग्विजय बागल यांच्या गटातील तब्बल 55 शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा दिला आहे.  हा शिवसेना शिंदे गटासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का मानला जात आहे.एवढंच नाही तर  या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी केलेले 20 हजार सभासद देखील पक्षातून बाहेर पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे सर्व वीस हजार सभासद आपले राजीनामे पोस्टाने पक्षश्रेष्ठींना पाठवणार असल्याची माहिती यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.  हा निर्णय शिवसेना शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या सामूहिक राजीनाम्यामुळे करमाळा शहरातील शिवसेना शिंदे गटाची ताकद कमी होण्याची चिन्ह आहेत.दिग्विजय बागल यांनी यापूर्वी शिवसेना शिंदे गटाकडून करमाळा विधानसभेची निवडणूक लढवली होती, त्यामुळे त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने पक्षात कार्यरत आहेत. माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नियुक्तीमुळे बागल यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून, आगामी निवडणुकीत बागल गटाला डावलले जात असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे, याच नाराजीतून हे सामूहिक राजीनामा नाट्य घडले आहे. या बैठकीस श्री मकाई सह साखर कारखाना संचालक सतीश नीळ, आशिष गायकवाड, राजेंद्र मोहोळकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कुलदीप पाटील माजी संचालक आनंदकुमार ढेरे, रंगनाथ शिंदे, माजी सरपंच नवनाथ बदर, अशोक हनपूडे, रावगावचे सरपंच संदीप शेळके, राणा वाघमारे, विजयसिंह हाके, रवी भाऊ शेळके ,अक्षय सरडे, केशव शिवाजी बोराडे, विशाल साधू शिंदे, आनंद रामभाऊ टेकाळे, विजय संजय काळे, प्रशांत भगवान पवार, केशव शिवाजी बोराडे, संदीप पोपट गोडसे, महादेव विठ्ठल माने, सतीश विठ्ठल सोनवणे, दत्तात्रेय रविंद्र काळे, लहू नवनाथ पवार, सचिन नाना शिंदे, पप्पू मारुती सरक, शहाजी गजब काळे, दीपक पांडुरंग हाके, संदीप प्रकाश हाके, सतीश शिवाजी घेडे, हेमंत दत्तात्रेय शिंगरे, सुदाम दादासाहेब झोळ, हेमंत दत्तात्रय गिरंजे, संजय गणपत डोळे, संतोष सोपान चांदणे, ओमकार बाळासाहेब करे, प्रमोद अंबादास हाके, प्रतीक दत्तात्रे हाके, विशाल विष्णू माने, किरण विठ्ठल डोंगरे, संदेश मोहन भोगे, जावेद पठाण, मुबारक इनामदारविविध गावातील ५५ शिवसेना शाखेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

20 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago