Categories: करमाळा

करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे १३ उमेदवार निवडणूक रिंगणात -भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे १३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांनी सांगितले आहे.. आमचें नेते माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या सूचनेनुसार महायुती धर्मपाळत या निवडणुकीत उरण्याचा निर्णय असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भारत अवताडे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काय खेळी खेळली जाते का हे याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.करमाळा नगरपालिकेची एक नगराध्यक्ष व २० नगरसेवक निवडण्यासाठी १० प्रभागातून निवडणूक होत आहे. माजी आमदार शिंदे यांनी सुरवातीलाच या निवडणुकीत महायुती म्हणून उतरण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ चिन्ह घेऊन बानू जमादार, आशपाक जमादार, स्वाती फंड, महादेव फंड, तेजल मोरे, ऋषिकेश शिगजी, गणेश माने, सुवर्णा जाधव, प्रशांत जाधव, धनश्री दळवी व सुहास ओहोळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी युवक जिल्हा उपाध्यक्ष आशपाकभाई जमादार राष्ट्रवादी युवक अध्यक्ष  जिल्हा अभिषेक आव्हाड, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अजिंक्य पाटील,उद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रसाद जगताप, फारूख जमादार,बबन चांदगुडे उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

20 hours ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago