Categories: करमाळा

करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी छाननीमध्ये 269 पैकी 203 अर्ज पात्र 66 अर्ज अपात्र

 करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीत 269 पैकी 203 अर्ज पात्र 66 अर्ज अपात्र झाले आहे. करमाळा नगरपालिकेच्या एक नगराध्यक्ष व 20 नगरसेवकाच्या जागेसाठी एकूण दाखल झालेल्या 269 जागेपैकी 203 अर्ज पात्र झाले असून 66 अर्ज अपात्र झालेले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारगे यांनी दिली आहे.मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता करमाळा नगरपालिकेच्या मतदान कक्षामध्ये मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारगे यांच्या व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा करमाळा नगरपरिषद मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्या उपस्थितीत छाननी करण्यात आली. अपात्र झालेल्या 66 उमेदवारी अर्ज मध्ये डमी अर्ज तसेच दुपार सूचक अधिकाराने अर्ज अपात्र ठरले आहेत 21 नोव्हेंबर पर्यंत अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत असून याबाबत कुणाची हरकत पात्र अपात्र बाबत हरकत घ्यायची असल्यास जिल्हा न्यायालयाकडे अपील करावे लागणार आहे. अपीलाची अंतिम 24तारीख राहणार असुन अर्जाबाबत नक्की पात्र अपात्र ठरणार आहे. 26 तारखेला अधिकृत चिन्हाचे वाटप होणार आहे त्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे यामध्ये किती अर्ज राहतील किती आघाड्या होतील हे स्पष्ट होणार आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

6 hours ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

10 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

16 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

22 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

1 day ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

2 days ago