Categories: करमाळा

करमाळा नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार नगराध्यक्ष पदासाठी महायुतीच्या भाजपच्या उमेदवार देवी यांना पाठिंबा -भरत भाऊ आवताडे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

*करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आठ जागी निवडणूक लढवणार असल्याचे मत करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ अवताडे यांनी व्यक्त केले. करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुसंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार कार्याध्यक्ष सुजित बागल तालुका प्रवक्ते एडवोकेट अजित विघ्ने राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड,  राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच विनय ननवरे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे ,सुहास ओहोळ सविताताई कांबळे, जयकुमार कांबळे  उपस्थित होते. या पत्रकार परिषदेमध्ये माजी नगरसेविका सौ सविता जयकुमार कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये प्रवेश केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अपक्ष पुरस्कृत म्हणून त्यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर करण्यात आले आहे . यावेळी पुढे बोलताना भरत भाऊ आवताडे म्हणाले की करमाळा नगरपालिकेचे निवडणूक महायुतीच्या माध्यमातून आम्ही एकत्रच लढवणार होतो. त्या संदर्भात सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमचे नेते संजयमामा शिंदे यांच्याशी आमची चर्चा सकारात्मकपणे चालू होती आम्हाला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून योग्य जागा प्रतिनिधित्व दिले जाईल असा शब्द त्यांनी दिला होता परंतु ऐनवेळी भाजपच्या वतीने इच्छुकांची संख्या वाढल्याने आम्हाला फक्त तीन जागा देण्यास ची सहमती त्यांनी दर्शवली वास्तविक पाहता आम्ही वीस जागावर लढवण्याची आमची तयारी होती त्या अनुषंगाने दहा जागा तरी आम्हाला मिळतील अशी अपेक्षा होती परंतु त्यांनी अपेक्षित शब्द न पाळल्याने आमच्या कार्यकर्त्याची ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेऊन मुस्कटदाबी होऊ नये म्हणून आम्ही आठ जागी नगरपालिका निवडणूक लढवण्याचा ठाम निर्णय घेतला असून आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संजयमामा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा नगरपालिका निवडणूक लढवणार असून महायुती म्हणून भाजपच्या नगराध्यक्ष पदाला ‌ आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सौ सुनीता देवी यांच्या उमेदवारी पाठिंबा देत असून राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा नगरपालिकेची निवडणूक स्वातंत्रपणे लढणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भरत भाऊ अवताडे यांनी सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

6 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

6 days ago