Categories: करमाळा

क्लासिक ऑइल कंपनीचे मालक उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचे कार्य युवा पिढीसाठी प्रेरणादायी -पत्रकार दिनेश मडके

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे उद्योजक क्लासिक ऑईल कंपनीचे मालक संतोष काका कुलकर्णी यांचे कार्य युवा पिढीसाठी प्रेरणादायी असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या संतोष काका कुलकर्णी यांचा आदर्श घेऊन युवा पिढीनी वाटचाल करावी असे मत करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष पत्रकार दिनेश मडके यांनी व्यक्त केले. संतोष काका कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हा सरचिटणीस करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे सचिव पत्रकार नरेंद्रसिंह ठाकुर, मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, संतोष काका कुलकर्णी यांच्या धर्मपत्नी सौ शामलताई कुलकर्णी, चिरंजीव शुभम कुलकर्णी सुन वैष्णवी कुलकर्णी नातु मल्हार कुलकर्णी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या महिला तालुकाध्यक्ष सौ सुषमा गिरवलकर  उपस्थित होते.सालाबादप्रमाणे सामाजिक उपक्रमाने त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . बुधवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी मुकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे खाऊचे वाटप करण्यात आले तसेच सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक शेठ खाटेर यांच्या दिव्यरत्न गोपालन संस्था करमाळा येथे गोमातेंना चारा देऊन आगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला आहे. दिव्यरत्न गोपालन संस्थेच्या वतीने संचालक त्यांचे संकेत खाटेर यांनी त्यांचा सत्कार केला.यावेळी मनोगत व्यक्त करताना भाजपचे जिल्हा सरचिटणीस पत्रकार नरेंद्रसिंह ठाकुर म्हणाले की संतोष काका कुलकर्णी यांचे कार्य नक्कीच समाजाला प्रेरणादायी असुन सर्वांना मदत करून त्यांच्या सुख दुःखात सहभागी होऊन संतोष काका कुलकर्णी यांनी मित्राचा मोठा गोतावळा निर्माण केला आहे.अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळा अध्यक्ष म्हणून ते दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शालेय साहित्याचे वाटप करून समाजाचे प्रश्न सोडवण्याचे काम तै करत आहे तराजुरी गावच्या विकासासाठी संतोष काका कुलकर्णी यांचे महत्वाचे योगदानअसुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा सर्वागिण विकास होत असल्याचे मत नरेंद्रसिंह ठाकुर यांनी व्यक्त केले. भाजप उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष म्हणूनही युवकांना रोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन करून त्यांना बँकेकडून कर्ज आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचे काम केले आहे.समाजसेवेचे असेच कार्य चालू ठेवुन युवापिढीला मार्गदर्शन करण्याचे आवाहन त्यांनी केले. संतोष काका कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की करमाळा तालुक्यात उद्योजक निर्माण होण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असून करमाळा तालुक्यात उद्योग उभारण्यासाठी आपण कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमचा करमाळा तालुक्यातील जो मित्र मंडळीचा ग्रुप हा राजकीय नसून एकमेकांच्या सुखदुःखात सदैव सामील राहणारा हा ग्रुप आहे त्यामुळे गावातील कुठलेही कार्यकर्त्यांना कोणतेही काम करण्यास कसलीही अडचण येत नसल्याचे त्यांनी सांगितले. वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या असून गुरूवर्य विलासरावजी घुमरे सर रामदास झोळ सर,पै अतुल भाऊ पाटील, युवा नेते दिग्विजय बागल, गणेश भाऊ कराड ,भारत घुगीकर काका ,रवींद्र विद्वत, महेश वैद्य राजुरीचे सरपंच राजेंद्र भोसले, बंडू शिंदे, गणेश जाधव एकनाथ शिंदे मनोज शिंदे उदय साखरे संजय साखरे पत्रकार श्रीकांत साखरे सागर कुलकर्णी शशिकांत पवार कमलादेवी औद्योगिक वसाहत येथील उद्योजक सुहास काळे पाटील, अर्जुन माने, शंकर कुलकर्णी यांनी उमेश पवार ,नारायण चौधरी मेहबूब मिर्झा यांनी वाढदिवसाच्या आपणास शुभेच्छा दिल्या असल्याचे संतोष काका कुलकर्णी यांनी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

6 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

6 days ago