करमाळा प्रतिनिधी. करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथील इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थीनी कुमारी- कोमल सुनिल चव्हाण रा. आलेश्वर हिला सन 2019 – 20 या शैक्षणिक वर्षात तिला मार्च 2020 बारावीच्या परीक्षेमध्ये 650 पैकी 550 गुण (84.61) प्राप्त झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे विभागीय मंडळाने तिला पुढील उच्च शिक्षणासाठी प्रतिवर्षी 80 हजार रुपये प्रमाणे पाच वर्षापर्यंत पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती जाहिर केली आहे . या गुणवंत विद्यार्थीनीचे अभिनंदन विद्या विकास मंडळाचे सचिव, विलासरावजी घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य, मिलिंद फंड महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.एल.बी. पाटील उपप्राचार्य , संभाजीराव किर्दाक , पर्यवेक्षक, रमेश व्यवहारे ,सायन्सविभाग प्रमुख, लक्ष्मण राख , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले यावेळी कोमल चव्हाण म्हणाली की , माझ्या या यशामध्ये सर्वात मोठा वाटा माझे आई-वडील, संस्थेचे सचिव, विलासरावजी घुमरे, प्रा. अमोल कांबळे , प्रा. विजय रोडगे यांचा सिंहाचा वाटा आहे. यांच्या अनमोल मार्गदर्शनामुळे मला या यशापर्यंत पोहोचता आले. या सर्वांची मी ऋणी आहे.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…