Categories: करमाळा

करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सावंत गटाने काढलेल्या पदयात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद रॅलीच्या माध्यमातून मोठे शक्ती प्रदर्शन

करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सावंत गटाने काढलेल्या पदयात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून रॅलीच्या माध्यमातून मोठे शक्ती प्रदर्शन केले आहे.सावंत गटाने करमाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून करमाळा नगरपालिका निवडणुकीत शिवसेना भाजप यांच्यापुढे मोठे आव्हान उभा केले आहे. सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत,मा . नगरसेवक संजय उर्फ पप्पू सावंत ॲड राहुल सावंत यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठलराव आप्पा सावंत भगवानराव सावंत गोपाळ बापु सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीमध्ये करमाळ शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शहरातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून शहर विकास माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी माजी नगरसेवक संजय उर्फ पप्पू सावंत यांच्या पत्नी सौ मोहिनी संजय सावंत यांच्यासह 20 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. करमाळा नगरपालिकेची निवडणूक गटातटाच्या राजकारणामध्ये आतापर्यंत होत होती या निवडणुकीत शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ही निवडणूक लढवत आहेत. जरी ही निवडणूक पक्षाची असेल तरी या निवडणुकीत शिवसेनेचे वतीने जगताप गट भाजपच्या वतीने रश्मी दीदी बागल युवा नेते दिग्विजय बागल यांचा बागल गट कन्हैयालाल देवीचा देवी गट भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे यांच्या सह प्रा, रामदास झोळ सुर्यकांत पाटील यांची साथ लाभत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांनी निवडणुकीत पक्षाचेवतीने आठ जागी आपले उमेदवार उभे करून निवडणूक लढवत आहेत.अशा सर्व गटातटाच्या नेतेमंडळींनी आव्हान देऊन सावंत गटाने या निवडणुकीत सर्वसामान्य जनतेच्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी करमाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून योग्य पर्याय उपलब्ध करून दिला असून करमाळा शहरातील जनतेचा त्यांना प्रचंड प्रतिसाद लाभत असून त्यांच्या निघालेल्या पदव्यात्रेला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी त्यांना परिवर्तन घडवून आणण्यासाठी पाठिंबा दिला असून विरोधकांना त्यांच्या पद यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी असल्याचे दाखवून देऊन मोठी शक्ती प्रदर्शन केले आहे.सावंत गटाने आतापर्यंत करमाळा शहरासह तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्याचे काम केले असून राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देऊन सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात सहभागी होऊन अठरापगड जातीच्या लोकांना आपल्या कुटुंबाचा भाग म्हणून न्याय देण्याचे काम केले असल्यामुळे जनतेच्या मनामध्ये प्रेमाचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले असल्यामुळे जनतेच्या पाठिंब्यामुळे ही निवडणूक लढवत असुन जनता आम्हाला नक्कीच निवडुन देऊन आमच्या कामाची पोचपावती देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

14 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

17 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

18 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago